Monday, December 4, 2023

Latest Posts

ड्रगमाफिया ललितसह १२ जणांवर मोक्का

ड्रग्ज माफिया ललित पाटील आणि त्याच्या १२ साथीदारांवर मोक्का कायद्यांतर्गत पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. अरविंदकुमार लोहरे आणि ललित पाटील हे टोळी प्रमुख होते.

ड्रग्ज माफिया ललित पाटील आणि त्याच्या १२ साथीदारांवर मोक्का कायद्यांतर्गत पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. अरविंदकुमार लोहरे आणि ललित पाटील हे टोळी प्रमुख होते. लोहरे हा एमडी बनवणारा महाराष्ट्रातील एक्स्पर्ट होता. ड्रगमाफिया ललित पाटीलकडून आणखी पाच किलो सोने जप्त करण्यात आले आहे. ड्रग्ज विकून मिळालेल्या पैशातून ललितनं सोनं विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे.

ललित पाटीलकडून आणखी पाच किलो सोने जप्त करण्यात आले होते. यापूर्वी तीन किलो सोने जप्त करण्यात आले. आतापर्यंत आठ किलो सोने जप्त करण्यात आले. अंमली पदार्थ विकून मिळालेल्या पैशातून ललित पाटीलने हे सोने विकत घेतले होते. गुरुवारी पुणे पोलिसांची एक टीम ललित पाटील ला घेऊन नाशिकला गेली होती. त्यानंतर त्यांनी हे सोने जप्त केले. ललित पाटीलने एका व्यक्तीकडे हे सोने ठेवण्यासाठी दिले होते. याशिवाय आम्ही पदार्थ तयार करणाऱ्या ललित पाटील आणि टोळीवर पुणे पोलिसांनी संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यानुसार कारवाई केली आहे.

ललित पाटीलने कोणतेही अंमली पदार्थ तयार केले नाही, वकिलांचा दावा
ड्रग्ज माफिया ललित पाटिलला तपासासाठी पुणे पोलिसांनी मुंबई पोलीसांकडून ताब्यात घेतले आहे. ललित पाटीलला सात नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ललित पाटीलच्या जीवाला पुणे पोलिसांकडून धोका आहे. ललित पाटील ससुन रुग्णालयात असताना त्याला पोलिसांकडून बेदम मारहाण झाल्याचा दावा ललितच्या वकिलांनी गुरूवारी कोर्टात केला. ललित पाटील आजारी असून त्याच्यावर हर्णीयाची शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याच सांगत ललित पाटीलच्या वकिलांकडून पोलीस कोठडीला विरोध केला होता. तसेच ललित पाटीलने कोणतेही अंमली पदार्थ तयार केले नसल्याचा त्याच्या वकिलांचा न्यायालयात दावा केला होता.

मोक्का कधी लावला जातो?
राज्य सरकारने मुंबईतल्या संघटीत गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी ‘टाडा’ या कायद्याच्या धर्तीवर १९९९ मध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा म्हणजेच ‘मोक्का’ कायदा बनवलाय. याच कायद्याचा आधार घेऊन शहरातील संघटीत गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात मोठं यश आलंय. मुंबईनंतर पुणे पोलिसांनी या कायद्याचा प्रभावीपणे वापर केलाय.. मोक्काची कारवाई केलेला खटला हा विशेष कोर्टात चालतो. . या काद्यान्वये गुन्हेगाराला लवकर जामीन नसल्यामुळे अनेक गुंड वर्षानुवर्षे तुरुंगात राहतात आणि त्यामुळे त्यांची सुटका होईपर्यंत त्यांची संघटित टोळी मोडकळीस आलेली असते.

हे ही वाचा : 

फुलंब्रीकर कुटुंब  कसं आहे,हे जाणून घ्यायचंय तर  या कुटुंबाला एकदा येऊन तर भेटा!

शाहरुखच्या ‘डंकी’ मध्ये झळकल्या ‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्री

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss