spot_img
spot_img

Latest Posts

Mumbai – Pune द्रुतगती महामार्ग होणार आठ पदरी

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग (Mumbai-Pune Expressway) आता आठ पदरी होणार आहे. हा महामार्ग बांधताना तो पुढचे २५ ते ३० वर्ष टिकून राहील अश्या स्वरूपात त्याची बांधणी करण्यात येणार आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग (Mumbai-Pune Expressway) आता आठ पदरी होणार आहे. हा महामार्ग बांधताना तो पुढचे २५ ते ३० वर्ष टिकून राहील अश्या स्वरूपात त्याची बांधणी करण्यात येणार आहे. या मार्गावर मोठया प्रमाणावर होणारी वाहतूक कोंडी आणि अपघात यांच्यात अडकला आहे. आता हा मार्ग आठपदरी होणार असून या मार्गावरील अनेक समस्या सुटणायास मदत होणार आहे. त्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग वरील समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने म्हणजे ‘एमएसआरडीसी’ (Maharashtra State Road Development Corporation) महत्वाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होणार आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गवरून अनेक वाहनांची येजा नेहमीच चालू असते. हा मार्ग अधिक सुरक्षित आणि चांगला होण्यासाठी आठ पदरी रस्ता तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. महामंडळाचा हा प्रस्ताव राज्य शासनाने स्वीकार केल्यास मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आठपदरी होणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी सुटणार आहे. राज्य शासनाने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास द्रुतगती मार्गाचे काम सुरू झाल्यापासून तीन वर्षांत काम पूर्ण करण्यात येणार आहे. या मार्गावर होणाऱ्या अपघाताचे ब्लॅक स्पॉट (Black spot) देखील शोधण्यात आला आहे. खेड शिवापूर येथील दर्गा फाटा, चेलाडी, सारोळा पूल, शिंदेवाडी, पंढरपूर फाटा, पेपर मिल आणि खंडाळा या भागात मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत. हे अपघात टाळण्यासाठी इंटेलिजन्स ट्रॅफीक मॅनेजमेंट प्रणाली (ITMS) प्रकल्प राबण्यात येणार आहे. या मार्गावर ४३० हायटेक सीसीटीव्ही कॅमरे संपूर्ण मार्गावर इंस्टाल करण्यात येणार आहेत. या महामार्गाच काम ऑक्टोंबर महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहे.

आयटीएमएस तंत्रज्ञानाचा वापर या महामार्गावर करण्यात येणार आहे. सर्व वाहतुकीचे नियंत्रण सॅटेलाईटद्वारे केले जणार आहे. त्यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गवर येणाऱ्या प्रत्येक गाडीवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून वॉच ठेवली जाणार आहे. या मार्गावर अपघात रोखण्यासाठी आयटीएमएस प्रणाली खूप महत्वाची ठरणार आहे. यामुळे महामार्गावरील अपघात टळतील.

हे ही वाचा: 

नाशिकमधील शेतकऱ्याचे आरक्षणासाठी सरणावर आमरण उपोषण… चारित्र्यावर संशय घेत पतीने केली पत्नीची हत्त्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss