Friday, December 1, 2023

Latest Posts

SPPU पुणे विद्यापीठाच्य वसतिगृहात पंतप्रधान मोदीविरोधातलं आक्षेपार्ह लिखाण भोवलं, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

SPPU पुणे विद्यापीठाच्य वसतिगृहात पंतप्रधान मोदीविरोधातलं आक्षेपार्ह लिखाण भोवलं, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) वसतिगृहात आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीवरुन अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, डाॅ. महेश रघुनाथ दवंगे यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. पुणे विद्यापीठाच्या वसतीगृहाच्या भींतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह लिखाण करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता पुणे विद्यापीठाच्या बाहेर भाजप आंदोलन करण्याच्या भूमिकेत आहे. या सगळ्या प्रकरणाबाबत पोलिसात गुन्हा दाखल करावा, अशी भूमिका आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने करण्यात येत होती. त्यामुळे डाॅ. महेश रघुनाथ दवंगे यांनी थेट पोलिसांत याबाबत तक्रार दिली आहे. यासंबंधित आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट आणि शिक्षणांचं माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठात हा सगळा प्रकार घडला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ८ नंबरच्या वसतीगृहातील पार्कींगमध्ये काळ्या रंगाने हे आक्षेपार्ह लिखाण करण्यात आलं आहे. काल रात्री उशीरा ही सगळी माहिती समोर आली. त्यानंतर विद्यापीठातील वसतीगृहातील संपूर्ण परिसर मोकळा करण्यात आला आहे. या ठिकाणी कोणालाही जाण्यास आता विद्यापीठ प्रशासनाकडून बंदी करण्यात आलेली आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने तपासणी सुरु –

या झलेल्या प्रकरणी आता चौकशी सुरू आहे व हा प्रकार कोणी केला आणि कोणत्या हेतूने केला आहे याची माहिती घेतली जात आहे. याशिवाय ६ नंबरच्या वसतिगृह परिसरातील आणि भिंतीजवळील सगळ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली जात आहे. हा प्रकार नेमका कोणी केला? याची माहिती घेतली जात आहे.

विद्यापीठात पोलिसांची टीम दाखल-

भाजपने आंदोलनाची भूमिका घेतली त्यानंतर पुणे पोलीस अॅक्शन मोडवर आले असून त्यांची एक टीम तयार करण्यात आली आहे. ही टीम विद्यापीठ परिसरात दाखल झालेली आहे. हा प्रकार केलेल्याला शिक्षा करण्यात यावी आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपकडून सातत्त्याने केला जात आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून या प्रकरणाबाबत कसून चौकशी करण्यात येत आहे.

हे ही वाचा : 

अंकिताचा पती विकी जैनसोबत ‘बिग बॉस १७’ मध्ये जाण्याचा निर्णय चुकल्याचं, बिग बॉस फेम मराठी अभिनेत्रीने व्यक्त केलं मत

Mahad मध्ये केमिकल कंपनीत भीषण आग, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss