गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी स्वारगेट एसटी आगार आणि पोलीस ठाण्याला भेट दिली. यांनतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे लवकरच पकडला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्वारगेट एसटी आगारात तरुणीवर अत्याचार झाल्याची बातमी पोलिसांनी बाहेर येणार नाही याची जाणीवपूर्वक दक्षता घेतली होती. ही बातमी बाहेर आली असती तर कदाचित आपल्याला आत जे संभाव्य लोकेशन मिळाले आहे, ते मिळू शकले नसते. त्यामुळे आरोपी दत्तात्रय गाडे हा सावध होऊन लांब पळून गेला असता. त्यामुळे ही घटना लपवण्याचा प्रयत्न झालेला नाही. केवळ गुप्तता बाळगण्यात आली होती असे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन या घटनेची सविस्तर माहिती दिली. ही घटना एसटी स्टँडच्या आवारात घडली, त्यादिवशी स्वारगेट पोलिसांकडून रात्री १२ ते पहाटे ६ वाजेपर्यंत कितीवेळा गस्त घालण्यात आली, हे सीसीटीव्हीत दिसत आहे. रात्री दीड वाजता पीआयने एसटी स्टॅण्डवर गस्त घातली होती. त्यांनतर पुन्हा रात्री ३ वाजता पीआय गस्त घालून गेले होते. हे सर्व सीसीटीव्हीत रेकॉर्ड झालं आहे. त्यामुळे पोलिसांकडून दुर्लक्ष झालं असं नाही. ते अलर्ट नव्हते असही नाही. घटनेच्या पाच तासाच्या अंतरात दोन वेळा पोलिसांनी गस्त घातली होती, असे योगेश कदम म्हणाले.
आरोपी दत्तात्रय गाडे याच्यावर चोरी आणि अन्य गुन्हे दाखल आहेत. पुणे शहरातील जे आरोपी आहेत, त्यांचा रेकॉर्ड पोलिसांकडे असतो. त्या आरोपींवर सातत्याने लक्ष ठेवले जाते. ग्रामीण भागातून आलेल्या गुन्हेगारांचा रेकॉर्ड पुणे पोलिसांकडे नसतो. व्यवस्थेत सुधारणा करण्यास निश्चितच वाव आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीसीटीव्ही लावण्यासाठी ४३७ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. हे सीसीटीव्ही एआय पद्धतीने कार्यरत असतील. फेशिअल रेकग्निशनच्या माध्यमातून आरोपीचा ओळखीचा चेहरा दिसल्यास पोलिसांना सूचना मिळेल, असे योगेश कदम यांनी यावेळी सांगितले.
हे ही वाचा:
दत्तात्रय गाडेच्या मैत्रिणीला पुणे पोलिसांनी भोरमधून बोलावलं; धक्कादायक माहिती समोर
Follow Us