सध्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. यामुळे नागरिक संतापले आहेत. राजकारणाविषयी बोलताना सामान्य नागरिक संताप व्यक्त करत आहेत. राज्यातील हे राजकारण आणि परिस्थिती पाहून इंदापूर तालुक्यातील पळसदेव गावामध्ये राजकीय पुढाऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष, असे बॅनर गावात लावले आहेत. मराठा आरक्षण्याच्या मुद्द्यावरून गावात नेते मंडळींना येण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पळसदेव गावाचा सीमेवर लावण्यात आले आहे. जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेत्यांना आम्ही गावात प्रवेश देणार नाही, अशी भूमिका सकल मराठा समाजाने घेतली आहे.
चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष असे बॅनर गावात लावण्यात आले आहेत. जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेत्यांना आम्ही गावात प्रवेश देणार नाही, असा मजकूर लिहिलेले बॅनर बनवण्यात आले आहेत. संपूर्ण राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटून उठला आहे. याचा पार्शवभूमीवर काही ठिकाणी आंदोलन करण्यात आली तर काही ठिकाणी बस जाळण्यात आल्या. मराठा आरक्षण हे अत्यंत महत्वाचे आहे. मतदानासाठी आपल्याला मराठा समाजचं दिसतो. त्यावेळी सगळे नेते मतदान मागण्यासाठी येणार. मात्र आता आरक्षण द्यायच्या वेळी सरकार कोणतीही ठाम भूमिका घेत नाही आहे. त्यासोबत कोणताही राजकीय पक्ष ठाम भूमिका घेत नाही. मराठा समाजाला शैक्षणिक आरक्षण मिळायला हवं. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमच्या गावात कोणत्याही राजकीय नेत्यांना प्रवेश देण्यात येणार नसल्याचं पळसदेव गावातील नागरिकांनी सांगितलं आहे.
राज्यामध्ये असलेल्या आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी मराठा समाजाचे आहेत. पण तरीही मराठा समाजाची परिस्थिती नीट नाही. त्यांना त्याच्या मूलभूत हक्कासाठी भांडण करावे लागते,ही खूप मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे ,मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तो पर्यंत गावात राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी करण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे उपोषणाची बसले होते. त्यानंतर आता त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या हातून ज्युस पिऊन उपोषण सोडले. मात्र आरक्षण द्या, असं सकल मराठा समाजाचं म्हणणं आहे आणि त्याचमुळे गावकरी आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे.
हे ही वाचा:
अंजीर खाण्याचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहित आहे का?
हे संवेदनशील नाही, गेंड्याच्या कातडीचे सरकार, नाना पटोले यांचा हल्लाबोल