Wednesday, November 29, 2023

Latest Posts

PUNE: जाळपोळप्रकरणी ४००-५०० मराठा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल.

PUNE: जाळपोळप्रकरणी ४००-५०० मराठा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल.

पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर नवले पुलाजवळील केलेल्या जाळपोळ प्रकरणी ४०० ते ५०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गर्दी जमा करत सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवले पुलावर मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक हे जमले होते, त्यामुळे या मार्गावर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

याबाबत सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दखल

पुण्यातील नवले पुलावर मराठा समाजाचे तरुण मोठ्या संख्येने आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यादरम्यान अनेक मराठा कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. तेव्हा रस्त्यावर टायरची जाळपोळ करण्यात आली होती. रस्त्याच्या मधोमध टायर जाळल्याने रस्त्यावर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं, त्यामुळे अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागला. पुण्यातील नवले पुलावर मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी काही कार्यकर्ते इथे आंदोलन करत होते. या आंदोलनावेळी मुंबई -बंगळुरू महामार्गावर टायर जाळण्यात आले होते. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात कलम ४४१ आणि कलम ३३६ अंतर्गत या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

वाहतुकीचा दोन ते अडीच तास खोळंबा

पुण्यातल्या नवले पुलावर संपूर्णपणे रास्ता रोखण्यात आला होता. यादरम्यान रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक टायर जाळल्याने पूर्णपणे बंद होती,पोलिसांनी या ठिकाणी पोहचून आंदोलकांची समजूत काढून तब्बल दोन ते अडीच तासांनतर वाहतूक सुरु करण्यात यश मिळवलं आहे. यावेळी मराठा आरक्षण आंदोलकांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली असून उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीला काही झाल्यास आंदोलन आक्रमकपणे करु असा इशारा देखील आंदोलकांनी या आंदोलनादरम्यान दिला आहे.

लवकरात लवकर मराठा आरक्षण द्या नाहीतर…

सरकारने लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा निर्णय घेऊन त्याची घोषणा करावी, मराठ्यांना आरक्षण देऊन राज्यातील मराठ्यांचा प्रश्न सोडवावा, अनेक मराठा समाजातील तरुण आत्महत्या करत आहेत व तसेच अनेक ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा निर्माण झालेला आहे जर राज्याची ही परिस्थिती पूर्ववत आणायची असेल, तर सरकारने तातडीने आरक्षण जाहीर करावं, असं मराठा आंदोलकांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : 

सर्वपक्षीय बैठकीनंतर मनोज जरांगे यांची पहिली प्रतिक्रिया

मराठ्यांना मागास ठरवणार कसं?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss