Pune Crime News: राज्यात एकाकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा गाजत असताना शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका २६ वर्षीय तरुणीवर चक्क बसमधे बलात्कार केल्याची घटना उजेडात आली आहे. यातील पीडित २६ वर्षीय तरुणीवर पहाटे स्वारगेट एसटी स्टँडमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी (Pune Crime) आणि महिलांवरील अत्याचारांचा घटनांचा मुद्दा तापला असताना गुन्हेगारी विश्वातून आणखी एक प्रकरण समोर आल्याने सर्वत्र एकच संतापाची लाट पसरली आहे. पीडित तरुणीला अनोळखी आरोपीने एसटी बस अन्यत्र थांबल्याचं खोटं सांगितलं, त्यानंतर तिला बंदमध्ये नेऊन तिच्यासोबत बळजबरी केल्याचा आरोप आहे. पहाटे साडेवाजताच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती आहे.
सदर घटनेची माहिती मिळातच पोलिसांची पथके आरोपीच्या मागावर असून त्याचा शोध घातला जात आहे. दरम्यान आज ( २६ फेब्रुवारी) पहाटे ५:३० वाजताच्या सुमारास पुण्यातील एसटी स्टँडवरील वर्दळीच्या परिसरात ही घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, २६ वर्षीय पीडित तरुणी काल पहाटे पुण्याहून फलटणला निघाली होती.स्वारगेट एसटी स्टँड परिसरात आल्यानंतर एका ठिकाणी ती थांबली होती. यावेळी एका अनोळखी इसमाने तिला तिची एसटी दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याचं सांगितलं. माझी एसटी याच ठिकाणी थांबते, मी तिकडे जाणार नाही, असं त्या मुलीने त्या इसमाला सांगितलंही, मात्र मुलगी एकटी असल्याचा फायदा घेत त्या तरुणाने तिला त्याच्या शब्दात अडकवलं.स्वारगेट एसटी स्टँड परिसरात असलेल्या एका अंधाराच्या ठिकाणी एक शिवशाही बस उभी होती. या ठिकाणी ती मुलगी गेली, आणि तिने ही एसटी तर बंद आहे असं देखील सांगितलं. पण, तू टॉर्च लावून आतमध्ये जा, हीच एसटी काही वेळात फलटणला निघेल, असं या नराधमाने तिला सांगितलं आणि स्वतः सुद्धा बसमध्ये शिरला. त्या दरम्यान बस स्थानकात ही घटना घडलीय.
गुन्हा घडल्यावर दत्तात्रय गाडे हा आरोपी फरार झाला असुन त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय. त्याच्यावर शिक्रापूर आणि शिरुर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. स्वारगेट बसस्थानक शहरातील सुरक्षित बसस्थानक समजलं जातं. तर २४ तास येथून बसेस जात असतात. दरम्यान, बसस्थानकात पीडित तरुणीला चुकीची माहिती देऊन डेपोत थांबलेल्या शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला असल्याचे पुढे आले आहे. स्वारगेट बसस्थानकात ही घटना पहाटे साडे पाचच्या सुमारास घडली आहे. हा आरोपी रेकॉर्डवरील असला तरी स्वारगेटला इतक्या गाड्या असताना ही घटना कुणालाच कशी कळली नाही? हा प्रश्न आहे. यामुळं स्वारगेट बसस्थानकातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या आरोपीला शोधण्यासाठी पथकं रवाना झाली आहेत, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
हे ही वाचा:
Bird Flu in Maharashtra: धाराशिव येथे कावळ्यांना बर्ड फ्लू; अनेक कावळ्यांचा मृत्यू