गुलियन बेरी सिंड्रोम या आजारावर पुणे महानगरपालिका सतर्क झाली आहे. आज आरोग्य विभागाने तातडीची बैठक बोलावली होती. यावर आढावा घेतला जाणार आहे. नेमका हा आजार कुठून कसा होतो यावर एक्सपर्ट टीम सोबत बैठक घेण्यात येणार आहे. पुण्यातील तीन ते चार हॉस्पिटलमध्ये 22 संशयित रुग्ण आहे. सहा पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत आहेत. या सगळ्यांचे सॅम्पल्स एनआयव्हीकडे पाठवण्यात आले आहेत.
हा आजार एका कोणत्यातरी वेगळ्या आजारासोबत लागून येतो आणि आजाराला सेकंडरी आजार म्हटलं जाते. १२ ते ३० च्या दरम्यानच्या वयोगटातल्या लोकांना आजार होतो. हा आजार धोकादायक नाही आणि घाबरून जाण्याचे कारण नाही.
आज या आजारासंदर्भात तातडीची बैठक बनवण्यात आली आहे. सगळ्या स्पोर्टशी कमिटी तयार करण्यात येणार आहे.
या सगळ्या संशयित रुग्णांची संपूर्ण माहिती घेऊन त्यावर तोडगा काढणार आहोत. सध्या या आजारासंदर्भात घाबरून जाण्याचं कारण नाही. हा संसर्गजन्य आजार नाही. वेगळी ट्रीटमेंट लागत नाही. नेहमीची जी ट्रीटमेंट असते ती ट्रीटमेंट दिली जाते. लवकरात लवकर बरं होणारा हा आजार आहेत, अशी माहिती पुणे महानगरपालिकेतर्फे देण्यात आली आहे.
हे ही वाचा :
घरच्याघरी पारंपरिक पद्धतीने हुरड्याचे थालीपीठ कधी खाल्ले आहे का? जाणून घ्या सोपी पद्धत