spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

पुण्याच्या स्टील कंपनीच्या मालकावर गोळीबार, आरोपी फरार

पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यतील प्रसिद्ध एमआयडीसी मानली जाणाऱ्या चाकण एमआयडीसी परिसरात चक्क गोळीबाराची घटना घडली आहे. स्मॉल स्केल इंडस्ट्रीजमधील कैलास स्टीलचे मालक अजय सिंग यांच्यावर हा गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्यात अजय सिंग यांच्या पोटात एक गोळी तर दुसरी गोळी पाठीत लागलेली आहे. दोन अज्ञात दुचाकीवर आले अन् त्यांनी कंपनीच्या गेटवरुनच कंपनीच्या मालकांवर हा हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन पसार झाले आहेत.

ही घटना चाकण एमआयडीसी परिसरात आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली आहे. कंपनी मालक अजय सिंग यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या हल्ल्यामागचं कारण हल्लेखोरांना बेड्या ठोकल्यानंतर समोर येईल. मात्र, या हल्ल्याच्या घटनेमुळे कंपनी परिसरात व चाकण एमआयडीसीत खळबळ उडाली आहे.

आरोपींच्या शोधासाठी 10 पथके तैनात
आरोपींच्या शोधासाठी पोलीस व गु्न्हे शाखेचे 10 ते 12 पथक कार्यरत झाले आहेत. कंपनीचे मालक प्रत्यक्ष जखमी, व कंपनीतील इतरांशी आम्ही चौकशी केली असून हा हल्ला खंडणी किंवा व्यवसायातून झालेला नाही असे प्रथमदर्शनी दिसून येते. त्यामुळे, याप्रकरणात हल्लेखोराचा नेमका हेतू काय, याचा तपास आम्ही करत असल्याचे पिंपरी चिंचवडचे डीसीपी डॉ. शिवाजी पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले.

हे ही वाचा : 

सरकार स्थापनेवेळी एकनाथ शिंदे रुसले तेव्हाच उदय होणार होता Sanjay Raut यांचा भाजपला टोला

रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीला नाराजी नाट्यामुळे स्थगिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss