स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला पुणे न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. शिरुरमधून या आरोपीला अटक करण्यात आली होती त्यानंतर पुणे न्यायालयात हजर करण्यात आले होते. या प्रकरणात आरोपीसोबत आणखी साथीदार आहेत का याचा तपास सुरु आहे. तसेच या प्रकरणातील आरोपीचा मोबाईल हस्तगत करून त्याला पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती.
पुण्यातील मध्यवर्ती भागातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये २६ वर्षाच्या तरुणीवर बलात्कार झाला होता. बलात्कार करणारा दत्तात्रय रामदास गाडे हा फरार होता. अखेर त्याला काल रात्री स्थानिकांच्या मदतीने अटक केली. शिरूरमधील गुनाट या मूळगावी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी ड्रोनची आणि डॉग स्कॉडची मदत घेतली होती.
हे ही वाचा:
Raj Thackeray: मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शन
Follow Us