पुणे शहराला शिक्षणाचे माहेरघर असे म्हंटले जाते. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून(Education Ministry) राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या मध्ये पुण्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिका मृणाल नंदकिशोर गांजाळे (Mrunal Nandkishore Ganjale) यांची निवड झाली आहे. हा पुरस्कार देशातील ५० शिक्षकांना देण्यात येणार आहे. त्यामध्ये मृणाल गांजाळे यांची महाराष्ट्रातून एकमेव महिला शिक्षिका म्हणून निवड झाली आहे.
मृणाल नंदकिशोर गांजाळे या पुणे जिल्यातील आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव महाळुंगे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्या शाळेत नवनवीन उपक्रम राबवत असतात. मृणाली या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासावर त्या भर देत असतात. २०२३-२४ च्या शरद पवार इंस्पायर फेलोशिप इन एज्युकेशनच्या (Inspire Fellowship in Education) मानकरी ठरल्या होत्या.राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी त्यांचे अभिनंद केले आहे. मृणाल गांजाळे यांची निवड राज्यस्तरीय निवड समितीने केली आहे आणि राष्ट्रीय पुरस्कारासाठी मृणाल यांचे नाव निवडण्यात आले. राज्यस्तरीय निवड समितीचे अध्यक्ष आणि शिक्षण आयुक्त म्हणून मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत असल्याचं मांढरे यांनी सांगितलं.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून दरवर्षी चांगले काम करण्याऱ्या शिक्षकाला हा पुरस्कार दिला जातो. राष्ट्रीय शिक्षक दिनी या पुरस्काराचे वितरण करण्यात येते.यावर्षी हा पुरस्कार देशातील ५० शिक्षकांना देण्यात येणार आहे. त्या पुरस्काराचे वितरण ५ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनमध्ये करण्यात येणार आहे. पुरस्कार विजेत्याला ५० हजार रुपये रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि पदक देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम दूरदर्शन आणि शिक्षण मंत्रालयाच्या स्वयं प्रभा वाहिनीवरून थेट प्रसारित केला जाईल आणि https://webcast.gov.in/moe. यांच्यावर बघता येईल. मागीलवर्षी हा पुरस्कार देशातील ४६ शिक्षकांना देण्यात आला होता. त्यामध्ये राज्यातील ३ शिक्षकांनाच समावेश होता. बीड जिह्यातील शिक्षक शशिकांत संभाजीराव कुलथे, पारगाव जोगेश्वरीचे शिक्षक सोमनाथ वामन वाळके, मुंबईतील चतुर्भुज नरसी मेमोरियल स्कूलच्या प्राचार्य कविता संघवी या तीन शिक्षकांचा समावेश होता.
हे ही वाचा:
अजित पवार NCP गटाला पक्षासह चिन्हही मिळणार, प्रफुल्ल पटेल यांचा मोठा दावा…
बच्चू कडूंंचा राष्ट्रवादीला टोला, ‘आम्ही एक-एक सुतळी बॉम्ब लावू…
रोज एक फळ खाल्याने शरीराला होणारे फायदे घ्या जाणून…
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.