Saturday, April 20, 2024

Latest Posts

पुण्यात पावसाच्या सरी कोसळण्यास सुरवात

गेल्या दोन दिवसात जरासे पावसाचे वातावरण दिसण्यास सुरवात झाली आहे त्याचबरोबर काळ होणाऱ्या IPL २०२३ च्या फणलं मॅचला वरून राजन ए अहमदाबादमध्ये मध्ये हजेरी दर्शवली आणि त्यामुळे कालची मॅच ड्रॉ करावी लागली.

गेल्या दोन दिवसात जरासे पावसाचे वातावरण दिसण्यास सुरवात झाली आहे त्याचबरोबर काळ होणाऱ्या IPL २०२३ च्या फणलं मॅचला वरून राजन ए अहमदाबादमध्ये मध्ये हजेरी दर्शवली आणि त्यामुळे कालची मॅच ड्रॉ करावी लागली. त्यामुळे हळू हळू काही राज्यांमध्ये वरून राजाने त्याची हजेरी दाजखावला सुरवात केली आहे. आणि आता हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढच्या आठवडाभरात मॉन्सून (Monsoon Update) केरळमध्ये (Kerala) दाखल होणार आहे. तर राज्यातील काही भागांत या आठवड्यात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज असून काही जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुण्यात पावसाला सुरूवात झाली आहे. कालपासून राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. तर पुढच्या २४ तासामध्ये राज्यातील बहुतांश भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.राज्यात १६ जूनपर्यंत मान्सून सर्वत्र दाखल होणार आहे. केरळात मान्सून ४ जूनपर्यंत तर मुंबई अन् कोकणात ८ ते १० जूनपर्यंत मान्सून दाखल होणार आहे. दरम्यान मराठवाडा, विदर्भात येत्या २४ तासांमध्ये पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

पुण्यात काल शहरात रात्री अनेक ठिकाणी पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटसुद्धा झाली. दरम्यान आज (मंगळवार) शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. काही परिसरात पाऊस देखील सुरू झाला आहे. पुणे जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणी यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.पावसाच्या हजेरीमुळे उकाडा थोडा कमी होऊन हवेतील गारवा वाढेल. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तर रविवारी हिंगोली, भंडारा, गोंदिया, नागपूरसह इतर काही भागांध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

हे ही वाचा:

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्मुला

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात रंगल्या गप्पा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss