मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची धामधूम ही सुरू आहे. निवडणुकांचा रणसंग्राम आता जोरदार सुरू झाला आहे. संपूर्ण राज्यभरात दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका या पार पडणार आहेत. आणि पुढे ३ दिवसांनीच म्हणजेच २३ नोव्हेंबर २०२४ रोजी या निवडणुकांचा निकाल हा जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार तोफांचा झंझावात हा सुरू झाला आहे. जोरदार प्रचार आता सगळ्याच पक्षांकडून सुरू झाले आहेत. अशातच राज्यात नवनवीन घडामोडी देखील सध्या घडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पुण्यातील कसबा विधानसभेची पोटनिवडणूक संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरली. धंगेकर आणि रासने दोघांचेही संपर्क त्यानंतर प्रचंड वाढले. एरवी सलग २८ वर्षे जिथे एकाच पक्षाचा झेंडा फडकत होता, तिथे पोटनिवडणुकीत एकदम दुसरा झेंडा लागणे शक्य नसते झाले पण हु इज धंगेकरने विषय बिघडला अन् काँगेसचे झेंडा फडकला. आगामी विधासभेतही कसब्याची निवडणूक चर्चेचा विषय ठरणार आहे.
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर, काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. येथे रविंद्र धंगेकर यांनी हेमंत रासने यांचा पोटनिवडणुकीत पराभव केला होता. आता त्याच मतदारसंघात काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांना तर भाजपकडून पुन्हा एकदा हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केल्यानं कसब्यात पुन्हा रविंद्र धंगेकर विरुद्ध हेमंत रासने अशी लढत पाहायला मिळेल. पुणे शहरातील कसबा पेठेतील पोटनिवडणूक राज्यभर गाजली होती. भारतीय जनता पक्षाच्या या पारंपारीक मतदार संघात काँग्रेसने सुरुंग लावले होते. कसबा पेठे हा भाजपचा बालेकिल्ला आहे. तब्बल 25 वर्षांहूनही अधिक काळ भाजपचा उमेदवार या ठिकाणी निवडून येत होते. या मतदारसंघातून स्व.मुक्ताताई टिळक, स्व. गिरीश बापट, स्व.अण्णा जोशी, स्व.डॉ अरविंद लेले यांनी प्रतिनिधित्व केले आहे. या ठिकाणी असलेल्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले होते. त्यामुळे 2023 मध्ये या ठिकाणी पोटनिवडणूक झाली.
भाजपने प्रचारात ‘हू इज धंगेकर?’, असा प्रचार विधानसभा पोटनिवडणुकीत केला होता. त्या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला होता. रवींद्र धगेंकर यांचा ११ हजार मतांनी विजय झाला होता. रवींद्र धंगेकर यांना 73,309 मते मिळाली होती. हेमंत रासने यांना 62,394 मते मिळाली होती. त्यामुळे हा मतदार संघ पुन्हा मिळवण्यासाठी आता भाजपला जोर लावावे लागणार आहे. पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपकडून अनेक इच्छुकांची रांग लागली होती. यात शहराध्यक्ष धीरज घाटे त्यानंतर मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. त्यातच धीरज घाटे यांना उमेदवारी मिळेल असं बोललं जात होतं. कारण कसब्यात ब्राह्मण उमेदवार द्यावा, अशी मागणी सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात आली होती. त्यामुळे धीरज घाटे यांना उमेदवारी मिळणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, याही वेळी हेमंत रासने यांना कसबा विधानसभा मतदारसंघाचा भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे
तसेच आताची लढत दुरंगी नसून तिरंगी होणार असल्याचे दिसते आहे. कारण मनसेचे गणेश भोकरे या मैदानात उतरले आहेत. गणेश भोकरे हे तरुण नेतृत्व म्हणून मनसेकडून विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांचा देखील दांडगा संपर्क आहे. कसब्यात मनसेलाही मताधिक्य असल्याचे दिसते आहे. त्यामुळे या तिरंगी लढतीत मतांचं गणित नक्कीच बदलणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या माजी महापौर कमल व्यवहारे यांनी बंडखोरी केली आहे. त्याचा काय परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. आता कसबा पेठेतील गेलेली जागा पुन्हा मिळवण्याचे आव्हान भाजपकडे आहे. हेमंत रासने यांना रवींद्र धंगेकर यांच्याकडून जोरदार लढत मिळणार आहे. यंदा भाजपचा पारंपारीक मतदार पुन्हा पक्षाकडे येणार का? हे आता २३ नोव्हेंबर रोजीच स्पष्ट होणार आहे.
हे ही वाचा:
Devendra Fadnavis यांचे Rahul Gandhi यांच्यावर टीकास्त्र; म्हणाले,”मग लाल संविधान कशासाठी?”
अजित पवारांकडून बारामती मतदारसंघासाठी जाहीरनामा सादर