Monday, June 5, 2023

Latest Posts

रोहित पवारांच्या रॅप सॉंगची चर्चा तरुणांमध्ये

सध्या रॅप करून अनेक तरुण प्रसिद्धी मिळवत आहेत आणि रॅप सॉंगची (Rap song) मोठी क्रेझ सुरु आहे. त्याचबरोबर या रॅपमध्ये वापरण्यात येणाऱ्या भाषेमुळे अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सध्या रॅप करून अनेक तरुण प्रसिद्धी मिळवत आहेत आणि रॅप सॉंगची (Rap song) मोठी क्रेझ सुरु आहे. त्याचबरोबर या रॅपमध्ये वापरण्यात येणाऱ्या भाषेमुळे अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु याच रॅप सॉंगचा वापर जनजागृतीसाठी सुद्धा होऊ शकतो हे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी ओळखले आहे. राहुल पवार यांनी रॅप सॉंगला नवी ओळख देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी तरुणांमध्ये जनजागृती करण्यासाठी एक रॅप सॉंग तयार केले आहेत. आमदार रहित पवार यांनी महाराष्ट्रामधील युवक-युवकींना एकत्रित आणून राज्याच्या भविष्याच्या धोरण निर्मितीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी त्यांनी हे महाराष्ट्र व्हिजन फोरम ही एक प्रभावी युवा चळवळ सुरु केली आहे.

पुढच्या पिढीला त्यांच्या राज्याच्या विकासाबद्दल असलेल्या अपेक्षा माध्यमांमधून सरकारपर्यत पोहोचवता येत आहेत. राज्यामधील अनेक शहरांमध्ये महाविद्यालयांमध्ये जाऊन आमदार रोहित पवार हे तरुणांशी संवाद साधत आहेत आणि त्यांना त्यांच्या प्रश्नांना अगदी मनमोकळी उत्तरे देखील देत आहेत. आतापर्यत पाच लाखाहून अधिक युवकांनी या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला आहे. बऱ्याच दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये राजकारणी आणि युवा रॅपर्स यांच्यामध्ये वेगळेच समीकरण पाहायला मिळले आहे. यादरम्यान रॅपर्सच्या माध्यमांमधून तरुणाईला महाराष्ट्र व्हिजन फॉर्म या युवा केंद्रित सामाजिक उपक्रमाबद्दल सांगण्यात आले आहे.

तरुणाईच्या सध्याच्या काळामधील ट्रेंड लक्षात घेता आमदार रोहित पवार यांनी नुकतंच काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र व्हिजन फॉर्म युवा केंद्रित सामाजिक उपक्रमाचे रॅप सोंग लाँच केले आहे. त्यांनतर हे सॉंग अल्पावधीत काळामध्ये व्हाट्सअँप आणि इतरही समाज माध्यमांवरून मोठया प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे. हे रॅप सॉंग शुभम जाधव अर्थात रॉक्सन या उभरत्या रॅपरने हे गाणे गायले आहे. जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या या रॅप सॉंग ला तरुणांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

हे ही वाचा : 

शेवगाव, सातारा येथील हिंसाचाराच्या घटनेमुळे पोलिसांना केले अलर्ट

देवेंद्र फडणवीसांकडून ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पालिका निवडणूका होतील याबाबतचे संकेत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss