Saturday, June 3, 2023

Latest Posts

धक्कादायक!, महामार्गावर ट्रॅक्टर – बोलेरोचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ५ जण जागीच ठार

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात अपघाताचे सत्र हे सुरूच आहे. नुकताच एक भीषण अपघात हा झाला आहे. रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मिरजेजवळ बायपासवर हा अपघात झाला आहे.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात अपघाताचे सत्र हे सुरूच आहे. नुकताच एक भीषण अपघात हा झाला आहे. रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मिरजेजवळ बायपासवर हा अपघात झाला आहे. यामध्ये जीप आणि विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरची जोरदार धडक होऊन ५ जण जागीच ठार झाले आहेत.

कोल्हापूर जिह्यातील राधानगरीजवळ असलेल्या सरवडेचे सर्व मृत आहेत. राँग साईडने जाणाऱ्या विटाने भरलेल्या ट्रॅक्टर आणि जीपची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला तर २ जण जखमी झाले आहे. मिरज जवळील वड्डी गावाजवळील हायवेवर हा भीषण अपघात झाला आहे.तर बोलेरो या गाडीमधील एकाच कुटुंबातील सर्वजण कोल्हापूरहून पंढरपूरच्या दिशेने चालले होते. यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टरला बोलेरोची धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, बोलेरो समोरुन पूर्णपणे ट्रॅक्टरच्या समोरच्या भागात घुसली.

 

या अपघातात तब्बल ५ जणांचा जागीच मृत्यू हा झाला आहे. या मध्ये ४ महिला आणि एका लहान बालकाचा समावेश होता. हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा पूर्ण चक्काचूर झाला आहे. तर यामध्ये २ जण गंभीर जखमी आहेत. जखमींना तातडीने मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गावर मिरजपासून सुरु होणार टप्पा मंगळवार १६ मे रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रीय महामार्ग अपघात झाला.

हे ही वाचा : 

अजित पवार यांच्या विषयावर संजय शिरसाट यांनी शिंदे गटाची भूमिका मांडली

मुंबईत उघडलेल्या पहिल्या अॅपलच्या स्टोअरचे नाव Apple BKC

मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही उभारणार रोहिदास भवन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss