Swargate Bus Crime: स्वारगेट एसटी डेपोतील शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला पुणे सत्र न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत असून आता दत्ता गाडे याच्या बँक अकाऊंट संदर्भात बोलले जात आहे.आरोपीच्या परिचित वकिलाने दत्ता आणि पीडिता यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा खळबळजनक दावा केला होता. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी या संदर्भात चौकशी केली असता पुणे पोलिसांच्या हाती महत्त्वाचा पुरावा लागला आहे.
या अनुषंगाने पुणे पोलिसांनी तपास केला असता अत्याचार झाला त्यावेळी आरोपी दत्ता गाडे याच्या बँक खात्यात फक्त २४९ रुपये आढळून आले आहेत. मग आरोपीच्या वकिलाने दावा केलेले ते ७ हजार ५०० रुपये कुठून आले, याचा तपास आता पुणे पोलीस करत आहेत. दरम्यान, आरोपीच्या पत्नीने सुद्धा आरोपीची बाजू लावून धरली आहे. बलात्कार झाला तर मग तरुणीचे कपडे फाटले का नाहीत? तिच्या अंगावर काही ओरबाडलेलं दिसत आहे का? बसमध्ये चढताना आधी तरुणी पुढे गेली मग माझा नवरा गेला. त्यानंतर दोनच मिनिटात ते बाहेर आले, याला बलात्कार म्हणतात का? असा सवाल दत्तात्रय गाडे याच्या पत्नीने उपस्थित केला होता. आता नराधम दत्ता गाडे याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याचे बँक खाते, ऑनलाईन पेमेंट या सगळ्याची चौकशी केली आहे. गाडे याच्या मोबाईलमधून कोणाकोणाला पैसे ट्रान्सफर करण्यात आले? संबंधित तरुणीला पैसे देण्यात आले का? या सगळ्याचा तपास पोलिसांनी केला. मात्र, पीडित तरुणी कधीच दत्ता गाडे याच्या संपर्कात नव्हती, हे स्पष्ट झाले आहे. तसेच दत्तात्रय गाडे तरुणीला ७५०० रुपये दिल्याचा जो दावा करत आहे, तो देखील खोटा असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
तर दुसरीकडे स्वारगेट एसटी स्टँडवरील उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये अत्याचार केलेल्या तरुणीने पोलिसांना दिलेला जबाब अखेर समोर आला आहे. तरुणीनं आरोपीकडे हात जोडून याचना केली होती. बलात्कारानंतर जीवे मारू नये म्हणून तरुणीने केली आरोपी दत्ता गाडेला विनंती दादा मला जीवे मारू नको अशी विनंती केली होती.दत्ता गाडे याने गळा दाबून जीवे मारायची धमकी दिली होती. तरुणीचे फलटणला जायचे तिकीट ही पोलिसांकडे पुरावा म्हणून जमा केलं होतं. एसी एसटीला खिडक्या नसल्याने बाहेर आवाज येत नसल्याचंही निष्पन्न झालं. पोलिसाकडून बसमध्ये चढून आवाज बाहेर येतो की नाही याची ही तपासणी करण्यात आली.वैद्यकीय समुपदेशक असल्याने वेस्ट बंगालच्या घटनेप्रमाणे आपल्याला ही मारून टाकतील अशी पीडीतेला भीती होती. त्यामुळेच दादा मारू नको अशी विनंती पीडितेनं आरोपीकडे केल्याचा जबाब तिने पोलिसांना दिला. दुसरीकडे आरोपी निर्दोष असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी करत पीडितेवर अत्यंत गंभीर आरोप लावले होते. त्यापैकी वकिलांनी केलेला एक दावा खोटा असल्याचं पोलिसांनी सांगितलं. यामुळे वकिलाच्या दाव्यातली हवाच काढली गेली.
हे ही वाचा:
Skin Care: पिंपल्सच्या समस्येपासून सुटकारा; गुलाब पाण्यात मिसळा ‘या’ गोष्टी