Friday, April 19, 2024

Latest Posts

Nagpur-Pune महामार्गावर भीषण अपघात, जागीच ३ जण ठार

एक भीषण अपघात नागपूर-पुणे महामार्गावर देखील झाला आहे. परंतु हा अपघात इतका भीषण होत की या अपघातात ३ जण जागीच ठार झाले आहेत. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात अपघाताचे सत्र हे सुरूच आहे. मोठं मोठे मार्गावर (Expressway) आणि अपघात यांचं जणू एक समीकरणच जुळलं आहे.असाच एक भीषण अपघात नागपूर-पुणे महामार्गावर देखील झाला आहे. परंतु हा अपघात इतका भीषण होत की या अपघातात ३ जण जागीच ठार झाले आहेत. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

सध्या संपूर्ण राज्यात अपघाताचे सत्र हे सुरुच आहे. अनेक ठिकाणी मोठं मोठे अपघात हे होत आहेत. असाच एक अपघात नागपूर-पुणे महामार्गावर देखील आहे. आज एकीकडे नागपूर-पुणे महामार्गावर अपघात झाला आहे आणि या अपघातात ३ जण जागीच ठार झाले आहेत तर दुसरीकडे अमरावतीजवळ देखील एक भीषण अपघात झाला आहे. या आपघातात तर एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू हा झाला आहे.

नागपूर-पुणे महामार्गावर सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का या गावा जवळ हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ट्रकने समोरून येणाऱ्या एसटीला जोरदार धडक दिली आहे. हा अपघात भीषण होता की या अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर ८ पेक्षा अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. अशातच मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या अपघातात एसटी आणि ट्रक या दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. ही एसटी संभाजीनगरहून वाशिमच्या दिशेने जात होती. त्याचवेळी सकाळी ६.१५ च्या दरम्यान ट्रक आणि बसची जोरदार धडक झाली. या अपघातात बसचा चालक जागीच ठार झाला आहे.

अपघात का होतात? नेमकी कारणं काय? पाहू या…

  • वाहन चालवताना चालकांचे वेगावर नियंत्रण नसणे
  • मद्य पिऊन वाहन चालवणे, अधिक वेळ वाहन चालवणे
  • धोकेदायक पद्धतीने ओव्हरटेक करणे, लेन कटिंग करणे
  • क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवणे
  • गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे
  • इतर वाहतूक नियमांचे पालन न करणे

हे ही वाचा : 

Manipur मध्ये माजी आमदाराने भडकवली दंगल, तब्बल ५ दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद

तब्बल ९ तासांच्या चौकशीनंतर Jayant Patil यांनी दिली पहिली प्रतिक्रिया….

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss