Thursday, April 25, 2024

Latest Posts

Pune Airport च्या नवीन टर्मिनलवर आता होणार चाचण्यांना सुरुवात

पुणे विमानतळावर उभारण्यात येणाऱ्या नवीन कार्गो टर्मिनलच ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. टर्मिनलचे उरलेले काम हे जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण केलं जाणार आहे.

पुणे विमानतळावर उभारण्यात येणाऱ्या नवीन कार्गो टर्मिनलच ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. टर्मिनलचे उरलेले काम हे जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण केलं जाणार आहे. तसेच ऑगस्ट महिन्यापासून पुणे विमानतळावरील नवं कार्गो टर्मिनलच्या सुविधांच्या चाचण्यांना सुरुवात केली जाणार आहे. व संप्टेंबर महिन्यात नवं कार्गो टर्मिनलचं उदघाट्न होण्याची शक्यता आहे. या नव्या कार्गो टर्मिनल मुळे पुणेकऱ्यांना प्रचंड फायदा होणार आहे. तसेच पुण्यातून होणारी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मालवाहतूक दुप्पट होणार आहे.

पुणे विमानतळावरून होणारी प्रवाशांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. प्रवाश्यांसोबत मालवाहतूक सुद्धा पुणे विमानतळावरून मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे जुने प्रवासी आणि मालवाहतूक टर्मिनल हे अपुरे पडत आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी नवीन टर्मिनल आणि मालवाहतुकीसाठी नवीन कार्गो टर्मिनल उभारण्याचे नियोजन विमानतळ प्रशासनाने केले आहे. त्यानुसार सध्या दोन नवी टर्मिनल उभारले जात आहेत. यापैकी कार्गो टर्मिनलचं काम हे शेवटच्या टप्प्यात आहे.


पुणे विमानतळाला स्वतःची जागा नाही आहे. पुणे विमानतळ हे भारतीय वायुदलाच्या लोहगाव येथील हवाई तळाच्या जागेमध्ये उभे आहे. या हवाई तळाचा एक भाग हा वायुदलाकडून तर दुसरा भाग हा एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या मार्फत प्रवासी विमानांची वाहतूक करण्यासाठी केला जातो. बऱ्याचवर्षा पासून पुणे विमानतळ हे स्थानांतर करण्याची चर्चा सुरु आहे. परंतु त्यासाठी लागणाऱ्या शकडो एकर जमिनीच्या अधिग्रहणात अनेक अडचणी येत असल्यानं नवीन एअरपोर्ट उभे राहू शकले नाही. म्हणूनच आहे त्या इमारतीला लागूनच विमानतळ प्रशासनानं नवीन टर्मिनल आणि मालवाहतुकीसाठी नवीन कार्गो टर्मिनल उभारण्याचे नियोजन केलं आहे. तसेच पुणे विमानतळाला ४७५ कोटी रुपये खर्चून वाढीव क्षमतेची नवीन टर्मिनल इमारत मिळणार आहे.

हे ही वाचा:

Bai Pan Bhari Deva चित्रपटाचे Music Director Sai Piyush सोबत गप्पा । Music Launch at Mahalaxmi

Shinde – Fadnavis सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळात भाजपच्या ६ तर शिवसेनेच्या ४ जणांना स्थान ?

नियमित मुंबई – पुणे महामार्गावरून प्रवास करणाऱ्यासाठी खुशखबर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss