पुणे शहर हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. पण मागील काही महिन्यांपासून पुण्यात अनेक नवनवीन प्रकार घडत आहेत. मित्रासोबत दारू पित असताना त्याच्या पत्नीविषयी अश्लीन बोलल्यामुळे पुलावरून ढकलून देत हत्या करण्याचा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. ही घटना पिंपरी चिंचवड मध्ये उघडकीस आली आहे. या हत्याकांडाची माहिती तब्बल ६ महिन्यांनी समोर आली आहे. या प्रकरणात वाकड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सिद्धांत रतन पाचपिंडे आणि प्रतीक रमेश सरवदे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दिनेश दशरथ कांबळे (वय २६, रा. एकता काॅलनी, बापुजी बुवा नगर, थेरगाव, पुणे) असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. मागील सहा महिन्यांपासून दिनेश बेपत्ता होता. दिनेशच्या आईवडिलांनी तो बेपत्ता असल्याची तक्रर केली होती.
दिनेश कांबळे हा सहा महिन्यांपासून बेपत्ता होता. पण दिनेश गायब झालेली तारीख आणि तक्रार यात तफावत असल्याचा पोलिसांना संशय व्यक्त केला होता. त्यामुळे पोलिसांनी या प्रकारचा तपास करायला सुरुवात केली. तपास सुरु असताना दिनेशचे मित्र ज्ञानेश्वर मोटे व श्रवण मोटे (दोघे रा. अशोका सोसायटी, रुम नं. २१, थेरगाव, पुणे) यांचेकडे चौकशी केली.त्यानुसार १५ मार्च रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास काळेवाडी फाटा शेजारी ग्राऊंडवर दिनेश मित्र सिध्दांत पाचपिंडे व प्रतीक सरवदेसोबत दारु पिण्यासाठी बसला होता. त्यानंतर त्यांच्यात भाडंण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पण दिनेशचा शोध लागत नव्हता. त्यानंतर सिध्दांत आणि प्रतिकला ताब्यात घेण्यात आले.
पोलीस तपासात सगळी माहिती समोर आली. सिध्दांत आणि प्रतिकने घडलेले सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. १५ मार्च रोजी दिनेश आमचा सोबत दारू पिण्यासाठी सोबत होता. पिंपरीमध्ये दारु पिल्यानंतर अॅक्सेस मोपेडवरुन तिघेही काळेवाडी फायटानजीक मोकळ्या मैदानात पुन्हा दारू पिण्यासाठी बसले. दारू पिल्यानंतर दिनेशने प्रतिकच्या पत्नीबाबत अश्लील भाषा बोलल्यामुळे त्याच्यात भाडं सुरु झाले. या भांडणात सिध्दांत आणि प्रतिकने दिनेशच्या डोक्यात सिमेंटचा तुकडा मारला आणि ते फरार झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जखमी दिनेशला अॅक्सेसवर बसवून औंधनंतर दापोडीत दुपारी सव्वा दोनच्या सुमारास कासारवाडीत नाशिक फाटा ब्रिजवरून खाली फेकून दिले यामध्ये त्याचा मृत्यू झाला. जुन्या पुणे मुंबई रोडवर मयत अवस्थेत आढळून आल्यानंतर बेवारस व्यक्तीचा अपघाताची केस भोसरी पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. त्यानंतर भोसरी पोलिसांनी या गुन्ह्याचा तपस केला.
हे ही वाचा:
जळगावातील वक्तव्यानंतर बच्चू कडू यांनी मागितली माफी
नांदेडमध्ये मराठा आंदोलनात सहभागी असलेल्या युवकाने केली आत्महत्या