Monday, November 27, 2023

Latest Posts

मतदारांचे प्रमाण वाढले, पण Youth ची संख्या कमी

मतदारांचे प्रमाण वाढले, पण Youth ची संख्या कमी

भारतातील लोकसभा निवडणुक पुढच्या वर्षी म्हणजेच २०२४ ला होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसून तयारीला सुरुवात केली आहे. मतदारसंघातील उमेदवारांच्या देखील चर्चा सुरु झाल्या आहेत. भाजप पक्षातील विविध आणि प्रमुख मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय नेत्यांना देण्यात आलेली आहे. यासोबतच सत्तेत असणारा भाजप पक्ष आणि या भाजप पक्षाच्या विरोधात एकत्र आलेल्या ‘इंडिया’ आघाडीकडून देखील मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात झालेली आहे. त्याचवेळी केंद्रीय निवडणूक आयोगाने देखील लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यास चालू केली आहे. २०२४ च्या जानेवारी महिन्यात लोकसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. हे जाहीर करण्यापूर्वी मतदार यादी अदयावत केली जात आहे. राज्याची प्रारूप मतदार याद्दी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रसिद्ध केलेली आहे.

नव्या मतदार यादीत मतदार वाढले

राज्य निवडणूक आयोगाने नवी प्रारूप मतदार याद्दी प्रसिद्ध केलेली आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यात १० महिन्यांत एकूण १ लाख मतदार वाढले आहेत. पुणे जिल्ह्यात आता एकूण ८० लाख ७३ हजार मतदारांची संख्या झालेली आहे. प्रारुप मतदार यादीवर ९ डिसेंबरपर्यंत हरकती नोंदवण्याचे आवाहन यातून करण्यात आले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाने आगामी निवडणुकांसाठी तयारी सुरु केलेली आहे. ही प्रारुप मतदार यादी निवडणूक आयोगाच्या www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

युवकांचे प्रमाण कमी

१८ ते १९ वर्षे वयोगटामधील तरुणांचे प्रमाण आपल्या देशाच्या लोकसंख्येत सुमारे तीन टक्के इतके आहे, परंतु मतदार यादीत त्यांचे प्रमाण केवळ अर्धा टक्के इतके आहे यामुळे यामुळे १८ ते १९ या वर्षे वयोगटामधील युवकांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवून घ्यावे, असे आवाहन केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे. महाविद्यालयांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे ज्यामुळे युवा मतदार त्यांचे नाव मतदार यादीत नोंदवतील. मतदार यादीत २० ते २९ वयोगटात येणाऱ्या युवकाची लोकसंख्या एकूण २८ लाख २७ हजार ३७६ इतकी आहे.

हे ही वाचा : 

“भारतीय तरुणांनी आठवड्याला ७० तास काम केलं पाहिजे” – नारायण मूर्ती

Best Station Thane : मध्य रेल्वेच्या ४६६ स्थानकांतून ठरले अव्वल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss