Friday, June 2, 2023

Latest Posts

Dr. Pradeep Kurulkar यांची एटीएस कोठडी आज संपणार

डीआरडीओचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांची एटीएस कोठडी संपत आहे. पाकिस्तानला देशाच्या संरक्षण क्षेत्रातील माहिती देण्याचा आरोप त्यांच्यावर होते.

डीआरडीओचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांची एटीएस कोठडी संपत आहे. पाकिस्तानला देशाच्या संरक्षण क्षेत्रातील माहिती देण्याचा आरोप त्यांच्यावर होते. आज दिनांक ९ मे रोजी त्यांना पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. कुरुलकर यानी नक्की कोणती माहिती दिली आणि नक्की कोणता तपास करायचा आहे याची माहिती एटीएसकडून न्यायालयात दिली जाणार आहे.

पुण्यातील डीआरडीओचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांना जाळ्यात अडकवण्यासाठी प्लॅन हा करण्यात आला. पाकिस्तानकडून झारा दास गुप्ता या बनावट नावाने त्यांच्याशी ऑक्टोबर महिन्यापासून संपर्क साधण्यास सुरुवात झाली . डीआरडीओ’च्या इंटेलिजन्सने तब्बल सहा महिने पाळत ठेवल्यावर कुरूलकर पाकिस्तानी हेराच्या संपर्कात असल्याचा निष्कर्ष काढला. सोशल मीडियावर सुरु झालेला झारा आणि प्रदीप कुरुलकर यांच्यातील संवाद पुढे व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुरु झाला. अतिशय खाजगी संवादाबरोबरच कुरुलकर यांना ब्रम्होस क्षेपणास्त्रासह इतरही क्षेपणास्त्रांच्या डिझाइन्सची माहिती विचारली जाऊ लागली हे सगळं संभाषण एटीएसच्या तपासात उघड झाले आहे. कुरुलकर यांच्याकडून कोणती संवेदनशील माहिती शत्रू राष्ट्रांना देण्यात आलीय याचा तपास आता एटीएससह देशातील इतर गुप्तचर यंत्रणा तपास करत आहेत.

यानंतर मोबाइल आणि लॅपटॉप इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे ताब्यात घेऊन त्याची फॉरेन्सिक चाचणी करण्यात आली. दरम्यान, कुरुलकर काही हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित असल्याची माहिती पुढे आली आहे. दोन वर्षांपूर्वीच्या त्याचे व्याख्यानाचे फोटो व्हायरल झाले. यामुळे सोशल मीडियावर सरळसरळ दोन विचारसरणींच्या लोकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा गदारोळ सुरू झाला आहे. कुरुलकरच्या लॅपटॉप, तसेच मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण तपास यंत्रणेकडून सुरू आहे. तसेच गुप्तचर यंत्रणेकडून (रिसर्च अँड नॅलिसिस विंग- रॉ) चौकशी सुरू करण्यात आली आहे.

तसेच पाकिस्तानी हेर आणि कुरुलकर यांची परदेशात भेट झाली होती. त्यांनी हेरांना नेमकी काय माहिती दिली, तसेच पाकिस्तानी मोहजालात (हनी ट्रॅप) कसे अडकले, याबाबतची माहिती घेण्यात येत आहे. कुरुलकरने इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांद्वारे पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह गोपनीय माहिती दिल्याचे तपासात आढळून आले आहे.

हे ही वाचा : 

अजित पवार यांच्या विषयावर संजय शिरसाट यांनी शिंदे गटाची भूमिका मांडली

मुंबईत उघडलेल्या पहिल्या अॅपलच्या स्टोअरचे नाव Apple BKC

मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही उभारणार रोहिदास भवन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss