Thursday, March 28, 2024

Latest Posts

पुण्यात वाहतूक कोंडीची मोठी समस्या, वाहतूक कोंडीत जगात 6 व्या क्रमांकावर

जागतिक वाहतूक कोंडीमध्ये पुणे जगामध्ये सहाव्या क्रमांकावर असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून पुण्यामध्ये वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे.

जागतिक वाहतूक कोंडीमध्ये पुणे जगामध्ये सहाव्या क्रमांकावर असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून पुण्यामध्ये वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. राहण्यासाठी योग्य आणि शिक्षणाचं माहेरघर असलेलं पुढे आता वाहतूक कोंडीमध्ये जगात सहाव्या क्रमांकावर आल्याने पुणेकर चांगलेच चिंतेत पडले आहेत. येणाऱ्या काही दिवसांमध्ये पुण्यामध्ये वाहतूक कोंडी अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. जगामधील विविध देशांच्या मोठ्या शहरामधील वाहतूक कोंडीचा सर्व्हे करण्यात आला आहे आणि हा सर्व्हे एका खाजगी संस्थेनं हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. टॉम टॉम या (Tom Tom survey) कंपनीनं वाहतूक कोंडीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

या अहवालानुसार भारतामधील तीन शहरांमध्ये सर्वाधिक ट्रॅफिक असल्याचे समोर आलं आहे. बंगरुळूचा जगामध्ये दुसरा क्रमांक तर पुणे सहाव्या क्रमांकावर आहे. भारताची राजधानी दिल्ली सातव्या क्रमांकावर आहे. पुण्यामध्ये दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे वाहतूकीची कोंडीची समस्याही पाहायला मिळत आहे. अनेक पुणेकर या वाहतुक कोंडीमुळे हैराण झाले आहेत. पुण्यामध्ये मागील आहि दिवसांपासून मेट्रोचे कामदेखील सुरु आहे. त्यामुळे देखील या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना दिसत आहे.

या संस्थेनं १० किलोमीटर अंतर जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेवरून निष्कर्ष काढला आहे. पुण्यामध्ये १० कि.मी अंतर जाण्यासाठी २७ मिनिटे लागत असल्याचं या सर्व्हेतून समोर आले आहे. पुण्यामध्ये आज जवळपास ४५ लाख वाहने आहेत. त्यामध्ये ८ लाख कार आणि घरातील प्रत्येकाची वेगळी दुचाकी असल्यानं दुचाकीची संख्या तुलनेनं जास्त आहे. तब्बल ३५ लाखांपेक्षा जास्त दुचाकी वाहने पुण्यामध्ये आहेत. त्यामध्ये पुण्यामध्ये पुणेकर खासगी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. यामध्ये PMPML ची स्थिती आणि त्यांचे मार्ग, उड्डणापुलाचं सुरु असलेलं काम आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, शहरामध्ये मेट्रोचं काम सुरु आहे. त्यामुळे पुण्यातील वाहतूक कोंडीमध्ये वाढ होत आहे.

हे ही वाचा : 

“राज ठाकरे यांनी जसे त्यांच्या काकांवर लक्ष ठेवले तसे मी माझ्या काकांवर लक्ष ठेवेल”, अजित पवारांचे प्रत्युत्तर

वरळीच्या पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयात विद्यार्थ्याचा मृत्यू

मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याचा विचारात असाल तर एकदा रेल्वेचे वेळापत्रक नक्की पहा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss