spot_img
Saturday, February 8, 2025

Latest Posts

पुण्याच्या आयटी कंपनीमधील हत्येचा व्हिडीओ समोर

पुण्याच्या विमाननगर परिसरात असलेल्या एका नामंकीय आयटी कंपनीत एका तरुणीची हत्या करण्यात आली होती. शुभदा कोदारे असे मृत तरुणीचे नाव होते. तिच्यासोबत काम करणाऱ्या कृष्णा सत्यनारायण कनोजा (वय 28 वर्षे) याने तिच्यावर सुऱ्याने वार करून तिला ठार मारले होते. या घटनेने पुण्यात खळबळ माजली आहे. या घटनेचा विडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. हा व्हिडीओ आयटी कंपनीतील एका इमारतीच्या खिडकीतून चित्रित करण्यात आला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, कृष्णा कनोजा याने आर्थिक व्यवहारावरुन शुभदाची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. कृष्णाने शुभदाला तब्बल 4 लाख रुपये दिले होते. मात्र, तिने खोटे कारण सांगून हे पैसे घेतल्याचे समजताच कृष्णा संतापला होता. मंगळवारी शुभदा बसने कंपनीत आली त्यावेळी कृष्णा त्याठिकाणी होता. शुभदा जवळ येताच माझ्या पैशाचं तू काय केलंस, असा प्रश्न करत वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर कृष्णाने कोणताही मागचा पुढचा विचार न करता किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या भल्यामोठ्या सुऱ्याने शुभदावर वार करायला सुरुवात केली. त्याने शुभदाच्या अंगावर चार-पाच वार करुन तिला जखमी केले.

शुभदा जखमी होऊन जमिनीवर बसल्याचे व्हिडीओत स्पष्टपणे दिसत आहे. त्यावेळी कृष्णा सुरा घेऊन तिच्याभोवती घिरट्या घालत होत्या. यावेळी आजुबाजूला कंपनीतील अनेक कर्मचारी उपस्थित होते. मात्र, कृष्णाच्या हातातील भलामोठा सुरा पाहून कोणाची पुढे जाण्याची हिंमत होत नव्हती. कृष्णाने वार केल्यामुळे शुभदा अर्धमेली होऊन जमिनीवर बसली होती. अखेर कृष्णाने तिच्याजवळ जाऊन तिला खाली पाडल्याचे व्हिडीओत दिसत आहे. यानंतर कृष्णाने आपल्याकडील सुरा जमिनीवर फेकून दिला. कृष्णाने सुरा फेकल्यानंतर आजुबाजूचे लोक त्याठिकाणी धावत आले आणि त्यांनी कृष्णाला मारायला सुरुवात केल्याचेही व्हिडीओत दिसत आहे. मात्र, हे सगळे घडेपर्यंत शुभदाच्या शरीरातून बरेच रक्त वाहून गेले होते. त्यामुळे रुग्णालयात नेण्यापूर्वी तिची मृत्यू झाली. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा:

रंग माझा वेगळा’ मालिकेच्या टीमने शिवानी-अंबरचं केलं केळवण; कलाकारांनी शेयर केले फोटो

बेघर नागरिकांनी टिपलेल्या फोटोच्या ‘माय मुंबई 2025’ दिनदर्शिकेचे प्रकाशन CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते पार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss