पुणे (Pune) शहरात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. काही दिवसांपासून खुणांची संख्या देखील वाढली आहे. अशीच एक घटना पुण्यातील वानवडी (Wanwadi) परिसरात घडली. तरुण मुलांच्या टोळीने एका तरुणाला दगडांनी ठेचून मारल्याची धक्कादायक घटना घडली. शनिवारी पहाटे काळेपडळ संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिराच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर ही घटना घडली आहे. वानवडी परिसरात वारंवार अश्या घटना घडत आहेत त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या खुनाचे कारण अजून स्पष्ट झाले नाही आहे. खून झालेल्या तरुणाचे नाव महादेव रघुनाथ मोरे (वय-२५) असे आहे. घडलेल्या या गुन्ह्यात पाच लहान मुलांचा देखील समावेश आहे. पोलिसांनी त्यांना सुद्धा ताब्यात घेतले आहे. घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. या घटनेत सामील असलेल्या अल्पवयीन मुलांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. नेमक्या या गुन्ह्यायाचे कारण स्पष्ट झाले नाही आहे.
पुण्यात काही दिवासांपूर्वी एका तरुणांवर चाकूने दहा ते बारा जणांनी वर केला होता. यामध्ये वार केलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडली आहे. पुण्यातील मंगल टॉकीज रस्त्यावर १५ ऑगस्ट रोजी रात्री एक वाजताच्या ही घटना घडली होती. चित्रपट पाहून आल्यावर या तरुणांवर चाकूने वर करण्यात आले. नितीन म्हस्के असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. नितीन चित्रपट गृहातून बाहेर पडला आणि त्याच्यावर चाकूने वार करण्यात आले होते. तेव्हा त्याचा जागीच मृत्यू झाला. तलवार, चाकू आणि लोखंडी रॉड अशी हत्यारे घेऊन दहा ते बारा जणांनी घेरून मस्के यांची हत्या केली होती.
सध्या पुण्यात काही शुल्क कारणावरून हत्या केली जात आहे. रोज नवे नवे गुन्हे समोर येत आहेत. छोटीमोठी भांडण, राग याच्यावरून खून केले जात आहेत. याच्या सोबतच बलात्कार, सायबर क्राईम आणि लैंगिक छळांच्या घटनेत वाढ झाली आहे. आता पुण्यात एका पाठोपाठ हत्त्या होत आहे. त्यामुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हे ही वाचा:
गौतमी पाटीलच नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला ‘
बिग बॉस नंतरची ‘दिल दोस्ती दिवानगी’