spot_img
spot_img
Tuesday, October 3, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

पुणे शहरात पाणी कपात होणार की नाही ? बैठकीत पालकमंत्र्यांनी घेतला निर्णय…

पुणे (Pune) शहरात यंदा पावसाळ्यात पाणी कपातीचे (Water reduction) संकट होते. कारण पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी सर्व धरणे शंभर टक्के भरली नाही.

पुणे (Pune) शहरात यंदा पावसाळ्यात पाणी कपातीचे (Water reduction) संकट होते. कारण पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी सर्व धरणे शंभर टक्के भरली नाही. यासाठी कालवा समितीची बैठक बोलवण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) होते. बैठकीत सर्व धरणांचा परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, यंदा पाऊस कमी झाला आहे. परंतु सध्या खडकवासला धरणात (Khadakwasla Dam) जलसाठा चांगला आहे. तसेच पवना आणि चासकमान धरण १०० टक्के भरली आहे. भामा आसखेडमध्येही जलसाठा आहे. यामुळे तूर्त पाणी कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील महिन्याभरात पाऊस किती पडतो? हे पाहून पाणी कपातीचा निर्णय घेण्यात येईल.

यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार राहुल कुल, अशोक पवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप आदी उपस्थित होते. नीरा प्रणालीमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत चार टीएमसीने पाणीसाठा कमी असून उपयुक्त पाणीसाठा ९१ टक्के आहे. सध्यातरी समाधानकारक पाणीसाठा आहे. लाभक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाणी समन्यायी पद्धतीने सर्वांना मिळेल यासाठी नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री पाटील यांनी जलसंपदा विभागाला दिल्या.

तसेच नीरा डाव्या कालव्याद्वारे संरक्षित सिंचन पूर्ण होताच शेटफळ तलाव ५० टक्के भरण्याचे नियोजन आहे. सध्या नीरा उजवा कालवा आणि डावा कालव्याचे आवर्तन नियोजनाप्रमाणे सुरू राहील. नीरा उजवा कालवा सल्लागार समिती बैठकीस आमदार समाधान अवताडे, शहाजीबापू पाटील आदी उपस्थित होते. कालव्याच्या शेवटच्या टप्प्यातील शेतीला योग्य दाबाने पाणी मिळाले पाहिजे. यासाठी कालवा क्षेत्रातील पाणी उपशावर नियंत्रण आणा. त्यासाठी आवश्यकता भासल्यास ठराविक वेळेतच वीज पुरवठा करावा. कालव्यातून उपसा होणारा अवैध पाणी वापर रोखण्यासाठी मनुष्यबळाचे फेरनियोजन करावे. इतर ठिकाणी कार्यरत असणारे मनुष्यबळ काही काळासाठी सिंचन व्यवस्थापनासाठी वापरावे, अशी सूचना महसूलमंत्री विखे पाटील यांनी केली.

हे ही वाचा: 

 राज ठाकरे यांनी साधला फोनवरून आंदोलकांशी संवाद

गौतमी पाटीलचे वडील सापडले गंभीर अवस्थेत…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss