spot_img
Saturday, March 22, 2025

Latest Posts

पुण्यात तरुणाचे रस्त्यावरील अश्लील कृत्य प्रकरण, गौरव आहुजाला १ दिवसाची पोलीस कोठडी

पुणे शहरातील येरवडा येथे मद्यधुंद अवस्थेमध्ये रस्त्याच्या मध्यभागी BMW कार उभी करून लघुशंका करून अश्लील वर्तन करणाऱ्या गौरव आहुजाला अखेर साताऱ्यातून ताब्यात घेतले आहे.

पुणे शहरातील येरवडा येथे मद्यधुंद अवस्थेमध्ये रस्त्याच्या मध्यभागी BMW कार उभी करून लघुशंका करून अश्लील वर्तन करणाऱ्या गौरव आहुजाला अखेर साताऱ्यातून ताब्यात घेतले आहे. पुण्यातील बड्या उद्योगपतीचा मुलगा असणाऱ्या गौरवने सार्वजनिक ठिकाणी दाखवलेली पैशांची मस्ती एका नागरिकाने आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केल्यानंतर याबाबत हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायराल करण्यात आला. त्यानंतर गौरव हा फरार झाला होता.

शनिवारी संध्याकाळी त्याने सोशल मीडियावर माफी मागणार व्हिडीओ शेअर केला. तसेच काही तासात आपण पोलीस ठाण्यात हजार होऊ असे त्याने सांगितले. मात्र त्यापूर्वी शनिवारी रात्री सातारा पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतले. त्यानंतर आज दोन्ही आरोपींना कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं. गौरव अहुजाला ७ दिवसांची पोलीस कोठडी द्या, अशी मागणी पोलिसांनी केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना केवळ एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. कोर्टात या दोन्ही तरूणांच्या वकीलांनी जोरदार युक्तीवाद केला.

भाग्येश ओसवालच्या वकिलांचा युक्तीवाद

भाग्येश ओसवाल याचे वकील पुष्कर दुर्गे यांनी युक्तीवाद करताना म्हणाले, एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. एक व्यक्ती गाडीतून खाली उतरली, पण माझा अशील गाडीत बसला होता. ओसवाल गाडीतून खाली उतरला नाही, ओसवाल गाडी सुद्धा चालवत नव्हता. भाग्येश ओसवाल स्वतः पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला आहे. भाग्येश ओसवाल याचा या गुन्ह्याशी काय संबंध आहे? फक्त गाडीत शेजारी बसला म्हणून त्याच्यावर कलम लावला गेला. भाग्येश ओसवाल याचा जामीन अर्ज दाखल करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

गौरव अहुजाच्या वकिलांचा युक्तीवाद

या प्रकरणातील मुख्य आरोपी गौरव आहुजाच्या वकिल सुरेंद्र आपुणे यांनी युक्तीवाद करताना म्हटलं की, नोटीस द्यायची नाही, मिडिया आणि राजकीय दबावाखाली या सगळ्या गोष्टी पोलिसांनी केल्या आहेत. सरळपणे सेक्शन ६५ लावलं गेलं. जो पर्यंत केमिकल रिपोर्ट येत नाही, तोपर्यंत कलम ६५ लागू शकत नाही. पोलिसांनी असं कुठलंही द्रव्य जप्त केलं नाही. गाडी गुन्ह्यात वापरली नाही, जस्टीफिकेशन पोलिसांकडून दिसून येत नाही, आरोपी पळून गेलेला नाही, तो स्वतः कराड पोलिसांकडे हजर झाला आहे, असा युक्तीवाद गौरव आहुजा याच्या वकीलांनी केला.

Shivsena UBT: मराठीचा अपमान,औरंगजेबाचा गौरव वाढत्या ढोंगाची निर्मिती; ठाकरे गटाकडून टीकाFollow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss