Friday, March 29, 2024

Latest Posts

अहमदनगरच्या शेवगावमध्ये दोन गटांत राडा

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये दोन गटांत दगडफेक झाली असून ४ पोलीस जखमी झाले आहेत. अनेक वाहनांचं खूप मोठं नुकसान झालं आहे. अहमदनगरच्या शेवगावमध्ये (Shevgaon) काल दोन गटांमध्ये दगडफेक झाली.

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये दोन गटांत दगडफेक झाली असून ४ पोलीस जखमी झाले आहेत. अनेक वाहनांचं खूप मोठं नुकसान झालं आहे. अहमदनगरच्या शेवगावमध्ये (Shevgaon) काल दोन गटांमध्ये दगडफेक झाली. छत्रपती संभाजी महाराज्यांच्या जयंतीनिमित्तशेवगाव शहरात मिरवणूक निघाली होती. या मिरवणुकीदरम्यान ही दगडफेक झाली. यामध्ये चार पोलीस जखमी झाले आहेत. तर काही वाहनांचंही नुकसान झालं आहे. छत्रपती संभाजी महाराज्यांच्या जयंतीनिमित्त शेवगाव शहरात मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक रात्री आठच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. यावेळी अचानक मिरवणुकीच्या दिशेनं एका गटानं दगडफेक केल्याची माहिती आहे. तर दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे की, धार्मिक स्थळावर अगोदर दगडफेक करण्यात आली. त्याचं प्रत्युत्तर म्हणून मिरवणुकीवर दगडफेक केली गेली. यामुळे दोन्ही बाजूनं जोरदार दगडफेक करण्यात आली . त्यामुळे पळापळ झाली. गोंधळामुळे व्यावसायिकांनी दुकानं पटापट बंद केली. जमावानं यावेळी वाहनांवरही दगडफेक करुन त्यांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. काही दुकानांवरही हल्ला चढवत तोडफोड केली गेली. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

शेवगावमध्ये रविवारी झालेल्या दगडफेकीत चार जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी पोलिसांनी १०२ लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. तर ५० अज्ञात लोकांवरही रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या २ तुकड्या सध्या शेवगावमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. हा वाद नेमका का सुरू झाला? याचं कारण अजूनही पोलिसांना समजले नाही. तर या संबधी पोलिसांचा तापास सुरु आहे. सध्या स्थितीला शेवगाव मध्ये तणावपूर्ण वाटेवर होते मात्र पोलिसांच्या देखरेखीखाली आणि तैनात केलेल्या २ तुकड्यांमुळे शांतता पाहायला मिळत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “छत्रपती संभाजी महाराज्यांच्या जयंतीनिमित्त शेवगाव शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान दगडफेक झाल्याचा प्रकार घडला. जमावानं दुकानांचं आणि वाहनांचं नुकसान केलं आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. यात चार पोलीस जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शहरात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मिरवणूक निघाली होती. यामध्ये मोठ्या संख्येनं तरुण सहभागी झाले होते. मिरवणूक रात्री आठच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. यावेळी अचानक मिरवणुकीच्या दिशेनं एका गटानं दगडफेक केल्याची माहिती आहे. तर दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे की, धार्मिक स्थळावर अगोदर दगडफेक केली त्यामुळे मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

हे ही वाचा : 

कर्नाटकातील निवडणुकांवर राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात जुंपली शाब्दिक चकमक

वांद्रे- वर्सोवा सी-लिंकला सावरकरांचं नाव द्या, देवेंद्र फेडणवीसांनी केली मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो कर.

Latest Posts

Don't Miss