राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वेगाने वाहू लागले आहेत. निवडणूक आयोगाने (Election Commission) मंगळवारी (१५ ऑकटोबर) पत्रकार परिषद घेत महाराष्ट विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडून निकाल जाहीर होणार आहेत. राज्यातील सर्वच पक्ष या अनुषंगाने आता मैदानात उतरले असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. अश्यातच आता राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, टीका टिपण्या करू लागले आहेत. तर दुसरीकडे प्रचारसभांना जोरदार सुरुवात झाली आहे. अश्यातच आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे नागपूरमध्ये उपस्थित आहेत आणि या ठिकाणी सभा घेत चांगलाच हल्लाबोल हा केला आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते राहुल गांधी हे नागपुरातून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या भागावर काँग्रेसने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे प्रचाराची सुरुवातही राहुल गांधी विदर्भातील नागपूरमधून केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधी हे आज ६ नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी नागपूर येथे संविधान सन्मान संमेलन आयोजित केले असून सायंकाळी मुंबईतील बीकेसीमध्ये महाविकास ‘आघाडीची गॅरंटी’ जाहीर केली जाणार आहे.
प्रत्येक नेत्यामध्ये एक द्व्ंद असतं. मला काय हवं आणि जनतेला काय हवं. यात द्वंद्व होतं. पण आंबेडकर आणि गांधी सारखे लोक आपली आवाज बंद करतात. त्यांच्या तोंडून आपलं दुख वेदना येत नाही. दुसऱ्यांच्या वेदना येतात. जेव्हा आपण हे संविधान भारतात केवळ काँग्रेस पक्षाने नाही,. केवळ नेहरू आणि गांधींनी नव्हे भारताने आंबेडकरांना सांगितलं तुम्ही हे संविधान तयार करा. तेव्हा देश त्यांना सांगत होता. आम्हाला वाटतं या संविधानात जे या देशात कोट्यवधी दलित आहे. त्यांची वेदना आहे, त्यांना रोज ती सहन करावी लागते. ते दुख तो आवाज या संविधानात गुंजला पाहिजे. ते काम आंबेडकरांनी केलं. संविधान फक्त पुस्तक नाही तर जगण्याचे तंत्र आहे. जगण्याची शिकवण संविधानात आहे. संविधानात प्रत्येक जाती-धर्माचा आदर झाला पाहिजे, असं म्हटलं आहे. संविधानात हजारो वर्षांपूर्वीचे विचार आहेत. संविधानामुळेच देशातील शिक्षण-अर्थव्यवस्था सुरु आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात फुले-बुद्धांचा आवाज आहे. जर संविधान नसतं तर आज निवडणूक आयोग नसतं.
आता लोक म्हणतात आंबेडकरांनी हे संविधान स्वातंत्र्याच्या एकदम नंतर बनवलं. मी तुम्हाला विचारतो, त्यात फुल्यांचा आवाज नाही का, बुद्धाचा आवाज नाही का, बसवन्नाचा आवाज नाही का, सावित्रीबाईंचा आवाज नाही का. याची आपण रक्षा करत आहोत. ही हजारो वर्ष जुनं पुस्तक आहे. यातील विचार आहे… आपण हे मॉडर्न व्हर्जन आहे. २१व्या शतकातील व्हर्जन आहे. पण यातील विचार हजारो वर्ष जुने आहेत. जे यात सांगितलं तेच बुद्धाने, अशोकाने सांगितलं. सर्वच महापुरुषांनी सांगितलं. तेच आंबेडकर आणि गांधींनी सांगितलं. हे केवळ पुस्तक नाही. ते भारताचं व्हिजन आहे. हे जगण्याची पद्धत आहे. हे पुस्तक म्हणजे मरण्याची पद्धत आहे. आम्ही जगू तर देशासाठी जगू. एकमेकांचा आदर करू. आणि दुसऱ्यांना देणार आहोत, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
हे ही वाचा:
Devendra Fadnavis यांचे Rahul Gandhi यांच्यावर टीकास्त्र; म्हणाले,”मग लाल संविधान कशासाठी?”
अजित पवारांकडून बारामती मतदारसंघासाठी जाहीरनामा सादर