spot_img
Monday, January 20, 2025

Latest Posts

तीन दिवस पावसाचा इशारा; पुणे शरासह १६ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

हिवाळा सुरु आहे. राज्यात थंडीचा कडाका आपल्याला पाहायला मिळाला आहे. आता राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका कमी झाला असून ढगाळ वातावरण निर्माण झाला आहे. पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण गेल्या दोन – तीन दिवसांपासून निर्माण झाले आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात किमान तापमान वाढलं आहे. मात्र दिवसभर हवेत गारवा असल्यामुळे थंडी जाणवत आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यात गुरवार पासून तीन दिवस पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पत्ता तयार झाला आहे. त्यामुळे तिकडून संपूर्ण जिल्ह्यात गहाळ वातावरण निर्माण झाले आहे. तसेच, उत्तर भारतातून शीत लहरी येत असल्यामुळे थंडी आणि पाऊस असे वातावरण राहणार आहे.

राज्यात पुण्यासह १६ जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. प्रामुख्याने २६ ते २८ डिसेंबरच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आगामी तीन ते चार दिवस पुणे शहरात थंडी आणि पाऊस असे वातावरण राहील असा अंदाज पुण्यातील हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यात शीत लहरी काश्मीर ते मध्ये प्रदेश मधून येत आहेत, कारण काश्मीर ते मध्यप्रदेशपर्यंतची सर्व राज्ये गारठली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने तिकडून बाष्पयुक्त वारे राज्यात येत आहेत. त्यामुळे राज्यातील सोळा जिल्ह्यांना 26 ते 28 डिसेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यात थंडी आणि पाऊस असे मिश्र वातावरण राहील, असा अंदाज आहे.

हवामान विभागाने राज्यात 16 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्याचा देखील समावेश आहे. प्रामुख्याने घाटमाथ्यावर 26 ते 28 डिसेंबरच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. गारपीट होण्याचीही शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्याचा परिणाम संपूर्ण जिल्ह्यावर होणार आहे. त्यामुळे आगामी तीन ते चार दिवस शहरात थंडी आणि पाऊस असे वातावरण राहील, असा अंदाज पुणे हवामान विभागाने वर्तवला आहे. काश्मीर ते मध्य प्रदेशपर्यंतची सर्व राज्ये गारठली असून, त्या भागांतून शीत लहरी राज्यात येत आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने तिकडून बाष्पयुक्त वारे राज्यात येत आहेत. त्यामुळे राज्यातील सोळा जिल्ह्यांना 26 ते 28 डिसेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यात थंडी आणि पाऊस असे मिश्र वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने वरतीवली आहे. या हवामान बदलाचा रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पिकांचे रक्षण करण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

26 डिसेंबरला कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता

धुळे,
नंदुरबार,
जळगाव,
नाशिक,
छत्रपती संभाजीनगर

27 डिसेंबर कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता

धुळे,
नंदुरबार,
जळगाव,
नाशिक,
नगर,
पुणे,
छत्रपती संभाजीनगर,
जालना,
परभणी,
बीड,
अकोला,
अमरावती,
बुलढाणा,
वर्धा,
वाशिम

28 डिसेंबर कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता

जळगाव,
नाशिक,
नगर,
छत्रपती संभाजीनगर,
जालना,
बीड,
अमरावती,
गोंदिया,
नागपूर

हे ही वाचा:

Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?

लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss