spot_img
spot_img
Tuesday, October 3, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

जालना प्रकरणावरून राज ठाकरेंनी चढवला राज्य सरकारवर हल्लाबोल

जालना (Jalna) येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे पडसाद संपूर्ण राज्याभर उमटले आहेत. ठिकठिकाणी आंदोलन ,जाळपोळ करण्यात येत आहे.

जालना (Jalna) येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे पडसाद संपूर्ण राज्याभर उमटले आहेत. ठिकठिकाणी आंदोलन ,जाळपोळ करण्यात येत आहे. अनेक जिह्यांमध्ये बस आणि गाड्या देखील जाळण्यात आल्या आहेत. जालना येथे सुरु असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी भेट घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले ‘ राजकारण्यांच्या नादी लागू नका हे मी आधीच सांगितले आहे. कायदेशीर बाजू देखील समजून घेतल्या पाहिजे. जालना येथील घटनेत पोलिसांना दोष देऊ नका, कारण त्यांना आदेश देणारे दोषी आहेत. सत्तेत नसताना मोर्चे काढतात आणि सत्तेत आल्यावर गोळ्या झाडल्या जातात . फडणवीस म्हणतात राजकारण करू नका, पण फडणवीस विरोधात असते तर त्यांनी काय केले असते? मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, हे मी आधीच सांगितले होते. मला या नेत्यांप्रमाणे खोटे बोलता येणार नाही. मी मुख्यंमत्री यांची भेट घेणार आहे’. असे राज ठाकरे म्हणाले.

जालना येथील अंतरवाली सराटी गावात सुरु असलेल्या आंदोलकांना भेटण्यासाठी राज ठाकरे गेले आहेत. पण औरंगाबाद येथून निघाल्यावर राज ठाकरे यांचा ताफा ठिकठिकाणी अडवण्यात आला.यावेळी राज ठाकरे यांचा ताफा अडवून मराठा आरक्षणाबाबत वारंवार मागणी करण्यात आली . राज ठाकरे यांनी ठिकठिकाणी उतरून आंदोलकांची भेट घेतली आणि त्याच्या सोबत संवाद साधला. तर आपली भूमिका मी आंदोलकांच्या ठिकाणी जाऊन स्प्ष्ट करणार आहे असे देखील राज ठाकरे यांनी सांगितले आहे.राज ठाकरे म्हणाले ‘राज्यभरात जेव्हा आंदोलन निघतात त्यावेळी मी सांगितलं होत की, आरक्षण मिळणार नाही. तसेच राज ठाकरे या देखील म्हणाले होते की पोलिसांना कोणी दोष देऊ नका, त्यानां जे कोणी आदेश दिला त्यांना दोषी ठरवलं पाहिजे. आपल्या पुढच्या पिढीला इतिहास दाखवता येईल.तसेच गडकिल्ले हे आपले स्मारक आहेत. ज्या लोकांनी काठ्या मारल्या त्या सर्व लोकांना मराठवाडा बंदी करा. जोपर्यंत माफी मागत नाही.परंतु फडणवीस म्हणतात की, राजकारण करू नका, पण तुम्ही विरोधात असता तर काय केले असते. मी मुख्यमंत्री याना भेटेल आणि त्यांना हा सर्व विषय सांगेल, असे राज ठाकरे यांनी सांगितले आहे.

औरंगाबद विमानतळावरून राज ठाकरे हे जालन्याच्या दिशेने निघाल्यानंतर ते आधी केंब्रिज चौक येथे मराठा समाजातर्फे करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनाच्या इथे थांबले. पण तेथे उपस्थित असलेल्या आंदोलकांनी राज ठाकरे त्यांच्या ताफ्याला वाट मोकळी करून दिली. त्यामुळे त्याच्या ताफा जालनाच्या दिशेने निघाला. पण पुढे राज ठाकरेंचा ताफा आडुळ जवळील ठापटी तांडा येथे सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलकांनी अडवला. या वेळी राज ठाकरे यांनी गाडीतून उतरून आंदोलकांची भेट घेतली आणि तेथील आंदोलकांनी राज ठाकरेंना आपली भूमिका स्प्ष्ट करण्यासाठी सांगितली. तेव्हा राज ठाकरे म्हणाले मी जालना येथे माझी भूमिका स्पष्ट करणार आहे.

Latest Posts

Don't Miss