spot_img
Thursday, December 5, 2024
spot_img

Latest Posts

Raj Thackeray vs Uddhav Thackeray: त्यांना भाऊ जवळचा वाटत नाही, पण….निवडणुकीच्या तोंडावर Raj Thackeray यांनी व्यक्त केली खंत

Vidhansabha Elections: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत एकत्र येणार का? या प्रश्नावर खळबजनक उत्तर दिले आहे. मी आणि उद्धव एकत्र येऊ नये, यासाठी अनेक लोक प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये आतले आणि बाहेरचे असे सगळेच समाविष्ट आहेत. मी माझ्याकडून अलर्ट असतो. अनेक गोष्टी माझ्या कानावर येत असतात. हा असे बोलला, तो तसे बोलला अशा अनेक गोष्टी मला कळत असतात. पण असल्या गोष्टी मी ऐकून घेत नाही. उद्धव ठाकरे आणि मी एकत्र यायला पाहिजे असे वाटणे वेगळे आहे. असे व्हायचे असते तर ते कधीच झाले असते. समोरून त्यांच्याकडून काही लोक बोलत असतात, सांगत असतात पण मी तरी काय करणार असे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सांगितले आहे.

वर्सोव्यामध्ये हिंदुत्ववादी शिवसेनेचा उमेदवार हारून खान हे आहेत तर उर्दू भाषेतून त्यांची पत्रके सुद्धा निघत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरून कुठेही बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतले जात नाही. उद्धव ठाकरे काँग्रेसचा मफलर गळ्यात घालून फिरत आहेत. अशा प्रकारे उद्धव ठाकरे सगळाच व्यभिचार करत असतात पण त्यांच्याकडे बाकीच्या गोष्टींसाठी वेळ नाहीये, ही माझी खंत म्हणा किंवा अन्य काहीही म्हणा, पण हेच सत्य असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येणे हा माझ्या इच्छेचा किंवा माझ्या एकट्याचा प्रश्न नाही. प्रश्न असा आहे की, यामध्ये चर्चा होणे महत्त्वाचे आहे. चर्चा जर झालीच नाही तर बोलण्याला काय अर्थ आहे. तुम्ही जगभरात बघितले तर एकमेकांचे वर्षानुवर्षाचे दुश्मन वाद मिटवून सुद्धा एकत्र येतात. पण उद्धव ठाकरे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी जवळची वाटते मात्र भाऊ जवळचा वाटत नाही, यावर मी तरी काय बोलणार अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरे, फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील तपासली बॅग, पालघर हेलिपॅडवर झाली तपासणी

Kesarkar, Rane यांचा रविंद्र Chavan यांना त्रास, Vishal परब काय करतायत? | Devendra Fadanvis

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss