spot_img
spot_img
Wednesday, October 4, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

राज ठाकरे यांचं पुढचं लक्ष बारामती! लवकरच घेणार…

राज्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षामुळे मनसेने (MNS) आता बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आणि याच पार्श्वभूमीवर मनसेचे बारामती लोकसभा प्रमुख वसंत मोरे (Vasant More) बारामती दौऱ्यावरती आले होते.

राज्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षामुळे मनसेने (MNS) आता बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आणि याच पार्श्वभूमीवर मनसेचे बारामती लोकसभा प्रमुख वसंत मोरे (Vasant More) बारामती दौऱ्यावरती आले होते. कार्यकर्त्यांची आढावा बैठक झाल्यानंतर मनसे नेते वसंत मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती शहरात राज ठाकरे (Raj Thackeray) लवकरच कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा घेणार असल्याची माहिती मोरे यांनी पत्रकारांना दिली.

बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख म्हणून मोरे यांची निवड झाली आहे. त्यामुळे बारामती मतदारसंघातील तालुक्यात दौरा सुरू असून पक्षातील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी चाचपनी चालू आहे. पक्ष संघटन मजबूत करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यावेळी मोरे यांनी निवडणुका लढणे यावर बोलणे टाळले आणि लवकरच आम्ही राज ठाकरेंचा बारामती शहरात कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा होणार आहे आणि यांच्यासाठीच मी बारामतीत आलो आहे, असं माध्यमांशी संवाद साधताना मोरे यांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून वसंत मोरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर नाराज होते. त्यामुळे तडफदार नेते काही दिवसांपासून दुसऱ्या पक्षात जाणार अशी चर्चा होती. त्यामुळे वसंत मोरे हे मनसेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) आणि शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश घेणार असल्याची सगळीकडे चर्चा सुरु होती. मात्र वसंत मोरे जागेवरुन हलले नाहीत त्यांनी मनसे सोडणार नाही, असं अनेकदा बोलून दाखवलं. आता मनसेकडूनही पुणे (Shiv Sena) जिल्हातील गावागावात पक्षबांधणीला सुरुवात झाली आहे. त्याची जबाबदारी वसंत मोरे यांना देण्यात आली आहे. त्यात ते सध्या बारामतीकडे जास्त लक्ष देत आहे. या मतदार संघात मनसे वाढवण्याच्या तयारी दिसत आहे. त्यामुळे ते बारामती दौरा करत आहेत.

मनसेच नाही तर बारामतीकडे राज्यातील प्रमुख नेत्याचं लक्ष असल्याचं सातत्याने समोर येत आहे. भाजपचे (BJP) अनेक वरिष्ठ नेते बारामतीत दौरे करत आहे. चंद्रशेखर बावनकुळेंनीदेखील (Chandrasekhar Bawankule) मध्यंतरी बारामतीत दौरा केला होता. त्यांच्यासोबतच बाकी नेतेही बारामतीत काबीज करायच्या तयारीत आहे. मात्र राज ठाकरेंनी तगड्या माणसाकडे बारामतीची जबाबदारी सोपवली आहे. मात्र बारामती पवारांची आहे आणि पवारांमध्येच आता फुट पडली आहे. त्यामुळे या फुटीचा फायदा बाकी पक्षाला होतो का?, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

हे ही वाचा: 

Janmashtami 2023, यंदाच्या वर्षी घरच्या घरी बनवा पारंपरिक पद्धतीने गोविंद लाडू

Eco Friendly Makhar, यंदा घरच्या घरी लाडक्या बाप्पासाठी बनवा इको फ्रेंडली मखर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss