मागील काही दिवसांपासून राज्यभरात सर्वच भागात पाऊस पडत आहे. पण काहीवेळा हवामान खात्याने दिलेल्या चुकीच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. हवामान खात्याचा अंदाज चुकीचा असल्यामुळे शेती धोक्यात येऊ लागल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी व्यक्त केले आहे. भारतीय शेतीच्या आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हवामान खात्याची भुमिका महत्वाची आहे. मात्र, केंद्र सरकार याकडं गांभीर्याने लक्ष देत नसल्याची टीका राजू शेट्टींनी केली. राजू शेट्टी यांनी पुणे येथील हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. के.एस.होसाळीकर यांची भेट घेतली. त्यानंतर ते बोलत होते.
दुष्काळ कसा घोषित केला जातो, तो करताना पर्जन्यमान आणि त्याचा कालावधी कसा असतो ? त्याचे निकष काय असतात ? इतर देशाप्रमाणे आपल्या देशात हवामानाची माहिती अचूक का दिली जात नाही ? ग्लोबल वार्मिंगमधील झालेल्या बदलामुळं हवामान विभाग कशा पध्दतीने काम करत आहे? हवामान विभागाची अचूक माहिती मिळण्यासाठी कोणते तंत्रज्ञान विकसित करावे लागेल? शेतीबरोबर आरोग्यासाठी हवामान विभागाची महत्वपुर्ण भुमिका ? यासह विविध विषयावर राजू शेट्टींनी डॉ. के.एस.होसाळीकर यांच्याशी चर्चा केली. अचूक हवामानाचं तंत्रज्ञान विकसीत करुन हवामान निरीक्षणाचे जाळे वाढवावे लागेल असेही शेट्टी म्हणाले.
भारतीय शेती आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने हवामान विभागाचा अंदाज खूप महत्वाचा आहे. मात्र केंद्र सरकार याकडे लक्ष देत नाही. हवामन खात्याचे अंदाज अचूक नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे असे राजू शेट्टी म्हणले. यावर्षी राज्यामध्ये परतीचा मान्सून हा समाधानकारक असून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात राजस्थानपासून सुरु झालेला परतीचा मान्सून राज्यात सर्वदूर पाऊस होईल असे मत पुणे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. के.एस.होसाळीकर यांनी व्यक्त केले. वास्तविक पाहता शेतकऱ्यांना हवामानाचे अद्यावत माहिती मिळण्यासाठी तालुक्यातील ब्लॅाक निहाय हवामान निरीक्षण केंद्रे असणे गरजेचे असल्याच होसाळीकर म्हणाले.गेल्या दीडशे वर्षपूर्वीची माहिती हवामान खात्याकडे उपलब्ध आहे. इतर देशप्रमाणे आपल्या देशात हवामानाचा अंदाज अचूक सांगणे गरजेचे आहे. सरासरी पाऊसाचे निकष हे जिल्हावार न काढता ब्लॉक विभागवार काढणे गरजेचे आहे.
हे ही वाचा:
कुणबी नोंदी शोधण्यासाठी गेलेले पथक रिकाम्या हाताने परतले
गणपती बापाच्या आगमनासाठी पुणेकर सज्ज