महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी नवीन वर्षाच्या निमित्ताने पंढरपूर येथील विठुरायाचे दर्शन घेतले. घरातील सर्व वाद संपू दे असे विठुरायाला साकडं घालत विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली. वर्षभरात अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील असे संकेतही दिले. अजित पवार यांच्या आई आशाताई पवार यांनी हे नवीन वर्ष सर्वांसाठी चांगले जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली.
याच दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार आणि अजित पवार यांनी पुन्हा एकत्र यावे अशी भूमिका स्पष्ट केली. यावेळी ते म्हणाले की, ” आज भीमा कोरेगावच्या शौर्या गाथेला २०७ वर्ष पूर्ण झाली. या ठिकाणी दरवर्षी लाखो अनुयायी अभिवादनासाठी येतात.आराखड्याची अंबलबजावणी अद्याप झालेली नाही. आंबेडकर चालवळीचं ते तीर्थ क्षेत्र आहे, याठिकाणी भव्य स्मारक व्हावं ही आमची मागणी आहे. रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रीपद मिळावं अशी मागणी होती. विधानसभेला एकही जागा आम्हाला सुटली नाही. लोकसभेला २ जागा मिळाव्यात आमची मागणी होती. बौध्द समाजाच्या मदतीमुळं २३७ जागांपर्यंत मजल मारता आली. लोकसभेला खोडसाळ प्रचार करण्यात आला होता. त्यामुळं NDA चं नुकसान झालं.” असे ते म्हणाले.
पुढे रामदास आठवले म्हणाले की, ” जे एक मंत्रीपद ठेवलेल आहे ते RPI ला द्यावं, येणाऱ्या महापालिका आणि इतर निवडणूकांमध्ये आम्हाला जागा द्यावात, आणि RPI ला एक महापौर पद देण्यात यावं. परभणीत संविधानाचा अपमान करण्यात आला. महिला रस्त्यावर उतरल्या त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. जणू ते पाकिस्तानमधून आले आहेत. सोमनाथ सूर्यवंशी आणि त्याचं कुटुंब लातूर वरून त्याठिकाणी आलं होत. त्याला लॉकअपमध्ये एवढी मारहाण करण्यात आली की त्यात त्याचा मृत्यू झाला. ह्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे ही गृह खात्याला विनंती आहे. संविधान मान्य नाही त्याला देशात राहण्याचा अधिकार नाही. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयाला मदत करण्यात यावी, त्याच्या भावाला नोकरी देण्यात यावी. देशमुख यांच्या हत्येला २२ दिवस झाल्यानंतर जवाब घेतला आहे. वाल्मिक कराड याला ताब्यात घेतला आहे, इतरही जण ताब्यात घेतलेले आहेत. त्याची चौकशी करण्यात यावी.”
अजित पवार यांच्या मातोश्री यांनी पंढरपूरला साकडं घातलं. आमची सुद्धा हीच इच्छा आहे शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावं. माझी अनेक दिवसांपासून इच्छा आहे शरद पवार यांनी NDA सोबत यावं.
हे ही वाचा:
शिवसेना ठाकरे गटाला राजन साळवी निरोप देण्याच्या तयारीत
Santosh Deshmukh Murder Case : मुख्य आरोपी सुदर्शन घुलेची मोठी अपडेट; CID घेणार दखल