आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असलेले रामगिरी महाराज यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रोझोन मॉलमध्ये मिशन अयोध्या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी रामगिरी महाराज आले होते, यावेळी हे वक्तव्य केलं आहे. अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला वर्षपूर्ती होण्याच्या पार्श्वभूमीवर प्रभू श्रीरामांची महिमा सांगणारा व विचार मांडणारा ‘मिशन अयोध्या’ हा चित्रपट २४ जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. भारताचा इतिहास, संस्कृती आणि आध्यात्मिकतेचा अभूतपूर्व संगम असणारा आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित आणि समीर सुर्वे दिग्दर्शित ‘मिशन अयोध्या’ चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा महंत रामगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार, ७ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथे पार पडला.
१९११ साली कलकत्ता येथे राष्ट्रगीताचे निर्माते रवींद्रनाथ टागोर यांनी तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर जॉर्ज पंचम यांची स्तुती केली.त्यांनी जनगणमन हे राष्ट्रगीत गायले पंचमी यांनी भारतावर अनेक अन्याय अत्याचार केले आहे. त्यामुळे भारताचे खरे राष्ट्रगीत देशाचे खरे राष्ट्रगीत जनगणमन नाहीतर वंदे मातरम असली पाहिजे असे विधान गोदा धामचे मठाधिपती रामगिरी महाराज यांनी केले. तसेच यासाठी आपल्याला संघर्षाची तयारी ठेवावी लागेल असेही महंत रामगिरी म्हणाले. रामगिरी महाराज म्हणाले, रवींद्रनाथ टागोर यांचं शिक्षणक्षेत्रात मोठं कार्य आहे. पण शिक्षण संस्थेतील लोकांना राजकीय लोकांशी समतोल राखावा लागतो. ब्रिटीश काळात ज्यांनी शिक्षण संस्था चालवल्या, त्यांना ब्रिटीशांना धरून चालावं लागत होतं, म्हणून त्यांनी ब्रिटीशांची स्तुती केली आणि त्यामुळेच त्यांना नोबल मिळाला असं रामगिरी महाराज म्हणाले.
आत्तापर्यंत चित्रपटांमध्ये हिंदू धर्मातील साधुसंतांना चुकीच्या पद्धतीने चित्रित केले गेले. त्याच पद्धतीने मुस्लिम धर्मगुरु किंवा ख्रिश्चन धर्मगुरु विरोधात असे दाखवले गेले नाही. मात्र आज हिंदू धर्मातील साधुसंता बद्दल चांगले दाखविण्यात येत आहेत, असे म्हणत त्यांनी, मिशन अयोध्या मराठी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. मंगळवारी (दि.७) सायंकाळी शहरातील एका मॅालमध्ये मिशन अयोध्या या मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंग च्या प्रसंगी बोलत होते. भविष्यामध्ये यासाठीही संघर्ष करावा लागेल, असेही महाराज म्हणाले. यावेळी व्यसपिठावर आमदार अनुराधा चव्हाण, चित्रपटाचे निर्माते, कृष्णा शिंदे, योगीता शिंदे, दिग्दर्शक समीर सुर्वे आदींची उपस्थिती होती. या चित्रपटाचे निर्माते म्हणून जबाबदारी कृष्णा शिंदे आणि योगिता शिंदे यांनी सांभाळली आहे. तर कथा कृष्णा शिंदे यांची असून पटकथा आणि संवाद लेखन समीर सुर्वे यांनी केले आहे. या चित्रपटातील सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांनी ट्रेलर लॉंच सोहळ्याला हजेरी लावली होती. तसेच रामगिरी महाराज यांच्या अनुयायांनीही बहुसंख्येने गर्दी केली होती. ज्ञानोबा – तुकाराम माऊलींचा गजर करीत टाळ मृदुंगाच्या तालावर वारकऱ्यांनी हजेरी लावली होती. यावेळी उपस्थितांनी ‘जय श्री राम’ नामाचाही जयघोष केला. तसेच यानिमित्ताने छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्य रस्त्यांवर आणि चौकात चित्रपटाची फलकबाजी करण्यात आली होती. तसेच महंत रामगिरी महाराज यांच्या आगमनाचे फलकही जागोजागी लावण्यात आले होते.
हे ही वाचा:
आगामी निवडणुकींसाठी मनसे पक्षात होणार नवीन बदल; Sandeep Deshpande यांचे वक्तव्य