spot_img
Wednesday, January 15, 2025

Latest Posts

रामटेक बंगाला शुभ का अशुभ ? Chandrashekhar Bawankule काय घेणार निर्णय?

मंत्रिमंडळ खातेवाटपानंतर आता मंत्र्यांना मंत्रालयातील दालनाचे आणि दालनाच्या पाठोपाठ सरकारी बंगल्याचेही वाटप करण्यात आले. महायुतीच्या ३१ मंत्र्यांना बंगल्याचं वाटप करण्यात आलं असून त्याची यादीही समोर आली आहे.

राज्यात महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर अखेर ८ दिवसांनी मंत्र्यांचे खातेवाटपही पार पडले. त्यामध्ये अनेक नेत्यांच्या खात्यांची खांदेपालट करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. तर काही नेत्यांना पहिल्यांदा मंत्रिपदाची संधी मिळाल्यानंतर महत्वाच्या खात्यांची जबाबदारी देखील देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ खातेवाटपानंतर आता मंत्र्यांना मंत्रालयातील दालनाचे आणि दालनाच्या पाठोपाठ सरकारी बंगल्याचेही वाटप करण्यात आले. महायुतीच्या ३१ मंत्र्यांना बंगल्याचं वाटप करण्यात आलं असून त्याची यादीही समोर आली आहे.

मलबार हिलवरील सर्वात प्रशस्त आणि सी फेसिंग व्ह्यू असलेला बंगला म्हणजे रामटेक बंगला. मात्र, याच रामटेक बंगल्याबाबत अनेक घडामोडी घडल्यानंतर अनेक मंत्री नाकही मुरडताना दिसतायेत. अशातच राजकीय वर्तुळात शुभ अशुभाची चर्चाही रामटेक बंगल्याबाबत होताना दिसत आहे. यंदा बंगला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना मिळाला आहे.

याआधी माजी मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar), एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांचं वास्तव्य ह्याच बंगल्यात होतं. मात्र अलीकडे झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात तिन्ही नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळताना दिसतोय. त्यामुळे अनेक उलट सुलट अशा चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. अशातच बावनकुळे हा बंगला स्वीकारतात का , हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचा:

Santosh Deshmukh हत्या प्रकरणी सुरेश धस यांचा मोठा खुलासा

CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते संगीत मानापमान चित्रपटाच्या ट्रेलरचे लॉन्चिंग

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss