गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा हा चांगलाच तापला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी दुसऱ्या टप्प्यात पुन्हा एकदा आंतरवाली सराटीत उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत संपल्याने मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा जालना येथील आंतरवाली सराटी गावात उपोषण सुरु केले आहे. तर राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा तापला असून, आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. गावागावात आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. तर काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचा देखील पाहायला मिळत आहे.अश्यातच आता `मराठा आंदोलनाची (Maratha Reservation) धग गावापासून आता मंदिरांपर्यंत पोहचल्याचं दिसून येतंय.
साताऱ्यातील मांढरदेवी गडावर (Satara Mandhardevi Temple) आता राजकारण्यांना प्रवेश बंदी जाहीर करण्यात आली आहे. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना आता मांढरदेवी गडावरील काळूबाईचे दर्शन घेता येणार नाही. मंदिराबरोबर गावात येण्यासही बंदी घालण्यात आली आहे. मराठा समाजातील अंदोलकांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. मांढरदेवी ग्रामपंचायतीनेही यावर शिक्कामोर्तब केलं आहे. जालन्यात मराठा आरक्षणासाठी सुरू झालेल्या आंदोलनाची धग आता राज्यभर पसरताना दिसत आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकारण्यांना गावबंदी करा अशा सूचना मनोज जरांगे यांनी केल्यानंतर आता गावागावात राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात येत आहे. त्यातच आता ही बंदी मंदिरापर्यंतही पोहोचल्याचं दिसून येतंय.
मराठा आरक्षणासाठी गेल्या सहा दिवसांपासून आमरण उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाणी पिण्यासाठी शेकडो लोकांनी हात जोडून प्रार्थना केली. यावेळी त्यांनी विनंती मान देताना पाणी घेण्याची विनंती मान्य केली. मात्र, सरकारला एखादा बळी द्यायचा असेल तर घेऊ द्या, जाणूनबुजून आपल्या समाजाच्या लेकरांवर अन्याय केला जात आहे. न्याय मिळवण्यासाठी, आरक्षण मिळवण्यासाठी एका जणाचा जीव गेला तरी चालतो पण न्याय मिळला पाहिजे, न्याय मिळण्याचा दिवस जवळ आला आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी देताना त्यांचे डोळे पाणावले.
हे ही वाचा :
‘बिग बॉस’च्या घरात अंकिता लोखंडे आणि विकी जैनमध्ये वाद
संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, मुख्यमंत्री भाजपची भांडी घासतात…