spot_img
Saturday, March 22, 2025

Latest Posts

नैतिकतेच्या मुद्द्यावरून राजीनामा घेतला…राष्ट्रवादी काँग्रेसकडून पत्रक जारी

धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर ट्विट करत वैद्यकीय कारणास्तव आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अधिकृत पत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यामध्ये धनंजय मुंडेंच्या हत्याप्रकरणाशी संबंध नाही, नैतिकतेच्या मुद्द्यावरून हा राजीनामा घेतला असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून सुरु असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा अखेर आज छडा लागला. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे सोमवारी समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या हत्येचे अमानुष फोटो आणि व्हिडीओने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारून तो राज्यपालांकडे पुढील कारवाईसाठी पाठवला आहे. तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर ट्विट करत वैद्यकीय कारणास्तव आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अधिकृत पत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यामध्ये धनंजय मुंडेंच्या हत्याप्रकरणाशी संबंध नाही, नैतिकतेच्या मुद्द्यावरून हा राजीनामा घेतला असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजीनाम्याविषयी पत्रक जारी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुरुवातीपासूनच स्पष्ट भूमिका राहिली आहे की, संतोष देशमुख हत्याप्रकरणातील दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी एक पत्रक जारी करण्यात आले. धनंजय मुंडे यांनी घेतलेला राजीनाम्याचा निर्णय हा नैतिकतेला धरून आहे. संतोष देशमुख प्रकरणाचा तपास कोणत्याही दबावाशिवाय सुरु आहे आणि तो असाच चालू राहून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही आचि अपेक्षा आहे. हे प्रकरण न्यायालयीन असून तपास सुरु असल्याने त्यावर अधिक भाष्य करणे उचित ठरणार नाही. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे सांगू इच्छितो की कोणत्याही गुन्ह्याला गैरकृत्याला पक्षाचे किंवा आत्ताच्या नेत्यांचे कधीही समर्थन असणार नाही. आजच्या घटनेतून हाच संदेश राज्याला गेला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर करत म्हटले आहे.

धनंजय मुंडे यांचे ट्विट

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे.

हे ही वाचा:

Manoj Jarange Patil: धनंजय मुंडे यांनी पापात सहभागी व्हावं, स्वतःहून मी हे पाप केलं अस म्हणायला पाहिजे – मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य

Dhananjay Munde Resignation: अखेर मुंडेंचा राजीनामा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आदेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss