spot_img
Wednesday, March 19, 2025

Latest Posts

BMC मध्ये 1846 कार्यकारी सहायक’ पदांसाठीचा निकाल जाहीर; ‘या’ संकेतस्थळावर पहा निकाल

BMC : मुंबईतील बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC) ‘कार्यकारी सहायक’ या संवर्गातील 1 हजार ८४६ जागा सरळसेवेने भरण्यासाठी आयोजित करण्यात आले होते. २ डिसेंबर ते १२ डिसेंबर २०२४ दरम्यात १ हजार ८४६ जागांसाठी परीक्षा घेण्यात आली असून पदांसाठी राज्यभरातून उमेदवारांचे हजारोने अर्ज दाखल करण्यात आले होते. अखेर या परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ रोजी जाहीर करण्यात आला असून मुंबई महानगरपालिकेच्या (https://portal.mcgm.gov.in) या संकेतस्थळावर हा निकाल जाहीर करण्यात आली आहे. परीक्षा दिलेल्या उमेदवारांना या दिलेल्या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल.

भरती प्रक्रियेसंदर्भात वेळोवेळी प्रसिध्द होणारी माहिती व सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द होणार असल्याने भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सदर संकेतस्थळ उमेदवारांनी वेळोवेळी पहावे, असे आवाहन बीएमसी प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या, परीक्षेचा निकाल आज (दिनांक २५ फेब्रुवारी २०२५) रोजी जाहीर करण्यात आली आहे. एकूण १७३४ पानांचा हा निकाल असून यामध्ये सर्व ९१ हजार २५२ उमेदवारांचा निकाल (गुण) समाविष्ट आहे. दरम्यान ही परीक्षा मुंबई महापालिकेतील ‘कार्यकारी सहायक’ पदासाठी २ डिसेंबर २०२४ ते ६ डिसेंबर २०२४ आणि ११ डिसेंबर २०२४ ते दिनांक १२ डिसेंबर २०२४ या कालावधीदरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यांमधील केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने परीक्षा पार पडली. या १ हजार ८४६ पदांसाठी एकूण १ लाख ११ हजार ६३७ उमेदवारांनी अर्ज केला होता. त्यापैकी ९१ हजार २५२ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली.

या परीक्षेदरम्यान कोणती अट वगळण्यात आली
या पदांसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 9 सप्टेंबर निश्चित करण्यात आली होती. मात्र, नोकरभरतीची तयारी करणारे विद्यार्थी, राजकीय नेते यांच्याकडून पहिल्या प्रयत्नात दहावी आणि पदवी उत्तीर्ण असल्यासंदर्भातील अट काढून टाकण्यासंदर्भात मुंबई महापालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. अखेर मुंबई महापालिका प्रशासनानं या मागणीची दखल घेत अट काढून टाकत असल्याची घोषणा करत नव्यानं जाहिरात प्रसिद्ध केली गेली.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss