spot_img
Thursday, March 20, 2025

Latest Posts

Rohini Khadse on Gulabrao Patil : रोहिणी खडसेंचा गुलाबराव पाटीलांना खोचक टोला, म्हणाल्या हेमा मालिनी..

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी महिला दिनानिमित्त राष्ट्रपतींना पत्र लिहीत चक्क एक खून महिलांना माफ करा. असे म्हटले होते. यावर गुलाबराव पाटील यांनी रोहिणी खडसेंना नक्की कोणाचा खून करायचा आहे, त स्पष्ट करावे असे म्हटले आहे. तर महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महिलांनी सुरक्षिततेसाठी स्वतःच्या पर्समध्ये मिरचीची पूड आणि चाकू ठेवावा असे वक्तव्य केले होते. यावर महिलांच्या सन्मानाबाबत आपण बोलूच नये, असं रोहिणी खडसेंनी म्हटलंय.

Rohini Khadse on Gulabrao Patil : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी महिला दिनानिमित्त राष्ट्रपतींना पत्र लिहीत चक्क एक खून महिलांना माफ करा. असे म्हटले होते. यावर गुलाबराव पाटील यांनी रोहिणी खडसेंना नक्की कोणाचा खून करायचा आहे, त स्पष्ट करावे असे म्हटले आहे. तर महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महिलांनी सुरक्षिततेसाठी स्वतःच्या पर्समध्ये मिरचीची पूड आणि चाकू ठेवावा असे वक्तव्य केले होते. यावर महिलांच्या सन्मानाबाबत आपण बोलूच नये, असं रोहिणी खडसेंनी म्हटलंय.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) म्हणायचे की, महिलांनी पर्समध्ये लिपस्टिकसह मिरचीची पूड आणि रामपुरी चाकू ठेवला पाहिजे. त्यावेळी विरोधक बाळासाहेबांवर टीका करायचे. परंतु आताच्या घटना बघितल्या तर महिलांनी आत्मसंरक्षणासाठी सज्ज राहिलं पाहिजे, असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी जळगावात महिला दिनानिमित्त (Internation Women’s Day 2025) आयोजित कार्यक्रमात केले होते. आता यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी गुलाबराव पाटील यांना टोला लगावलाय.

रोहिणी खडसे म्हणाल्या की, गुलाबराव पाटील आपण काल एक कार्यक्रमात महिलांनी सुरक्षिततेसाठी स्वतःच्या पर्समध्ये मिरचीची पूड आणि चाकू ठेवावा असे वक्तव्य केले होते. सगळ्यात पहिले तर महिलांच्या सन्मानाबाबत आपण बोलूच नये. कारण या आधीच्या एका वक्तव्यामध्ये आपल्याला महिलांबाबत किती आदर आहे हे आपण दाखवून दिले आहे. आपल्या मतदारसंघातल्या रस्त्यांची तुलना ही हेमा मालिनी यांच्या गालांशी आपण केली आहे. त्यामुळे महिलांच्या प्रति आपल्याला किती आदर आहे हे आम्ही आधीच बघितले आहे, असे त्यांनी म्हटले.

रोहिणी खडसे पुढे म्हणाल्या की, आपल्याला असे म्हणायचे आहे का महिलांनी सुरक्षिततेसाठी तुम्हाला हवं ते तुम्ही करून घ्या, आम्ही सरकार म्हणून तुमच्या संरक्षणासाठी काहीही करू शकत नाही. सरकारचे महिलांना सुरक्षित वातावरण देण्याचे अपयश आपण मान्य केले आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. आम्ही महिलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी लढतोय, त्यांच्यासाठी संघर्ष करतोय, तुम्ही त्यांच्यासाठी संघर्ष तर दूर त्यांच्यासाठी आवाज उठवण्याचा तर दूर तुम्ही तुमचं काय ते बघा असे म्हणून तुम्ही मोकळे झालात. तुमच्या या प्रवृत्तीचा आम्ही निषेध व्यक्त करतो. तुमच्या निर्लज्ज सरकारचा देखील आम्ही निषेध व्यक्त करतो, असा हल्लाबोल रोहिणी खडसे यांनी केला.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss