Friday, December 1, 2023

Latest Posts

दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर Sahyadri Express सुरु

मुंबई ते कोल्हापूर दरम्यान या एक्सप्रेसने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. पण गेल्या २ वर्षापासून एक्सप्रेस बंद असल्याने महालक्ष्मी एक्सप्रेसला मोठी गर्दी होत होती. तिकीट मिळणे ही अवघड झाले होते. त्यामुळे सह्याद्री एक्सप्रेस सुरु करण्याची मागणी होत होती. सह्याद्री एक्सप्रेस पुण्यापासून सुरु करण्याचा निर्णय रेल्वे (Railway) प्रशासनाने घेतला आहे.

कोरोनाच्या (Corona) काळात लॉकडाऊनमुळे (Lockdown) ट्रेन बंद करण्यात आल्या होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाईफलाईन असलेली ट्रेन (Train), लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस (Express) बंद करण्यात आल्या होत्या. त्यावेळी बंद झालेली कोल्हापूर (Kolhapur) ते मुंबई (Mumbai)धावणारी सह्याद्री एक्सप्रेस (Sahyadri Express) आता पुन्हा धावणार आहे. मागील दोन वर्षांपासून सह्याद्री एक्सप्रेस बंद झाली होती. मुंबईतून धावणारी ही सह्याद्री एक्सप्रेस सध्या पुण्यातून धावणार आहे. सीएसएमटी (CSMT) स्थानकावर प्लॅटफॉमचे काम सुरु असल्याने एक्सप्रेस मुंबईऐवजी पुण्यातून धावणार आहे. ५ नोव्हेंबरपासून कोल्हापूर ते पुणे (Pune) या मार्गाने सह्याद्री एक्सप्रेस धावणार आहे. ६ नोव्हेंबर ते १ जानेवारी २०२४ पर्यंत ही एक्सप्रेस धावणार आहे. पण मुंबईतून ती धावणार नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दररोज रात्री ११ : ३० वाजता ही रेल्वे राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्थानकावरून सुटेल. जी सकाळी ७ वाजून
४५ मिनिटांत पुण्यात पोहचेल. तर पुण्यातून रोज रात्री ९: ४५ वाजता सुटेल आणि कोल्हापुरात पहाटे ५: ४० वाजता पोहचणार आहे. सीएसटी स्थानकावर प्लॅटफॉमचे काम पूर्ण झाल्यानंतर ही एक्सप्रेस मुंबईपर्यंत धावेल अशी शक्यता आहे. पण सध्या तरी नवीन वर्षापर्यंत ती पुण्यापर्यंतच धावणार आहे. मुंबई ते कोल्हापूर दरम्यान या एक्सप्रेसने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. पण गेल्या २ वर्षापासून एक्सप्रेस बंद असल्याने महालक्ष्मी एक्सप्रेसला मोठी गर्दी होत होती. तिकीट मिळणे ही अवघड झाले होते. त्यामुळे सह्याद्री एक्सप्रेस सुरु करण्याची मागणी होत होती. सह्याद्री एक्सप्रेस पुण्यापासून सुरु करण्याचा निर्णय रेल्वे (Railway) प्रशासनाने घेतला आहे.

हे ही वाचा : 

जिनिलीया देशमुखने हाता-तोंडाला पट्ट्या बांधलेला हटके फोटो केला शेअर

Best Station Thane : मध्य रेल्वेच्या ४६६ स्थानकांतून ठरले अव्वल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss