अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात संत्री व मोसंबीचे नुकसान झाले होते त्यांचे अद्याप पंचनामे करण्यात आले नव्हते. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जि. प. सदस्य सलील देशमुख यांनी नागूपर येथे आंदोलन केले होते. यानंतर पंचमाने करण्याचे आदेश देण्यात आले. ही मदत मिळण्यासाठी सलील देशमुख यांनी शासन स्तरावर प्रयत्न केले. त्याच्या या पाठपुराव्याला यश आले असून प्रति हेक्टरी ३६ हजार रुपयाची मदत जाहीर करण्यात आली असून ती शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्याची प्रक्रिया सुरु झाल्याची माहिती सलील देशमुख यांनी दिली आहे.
काटोल व नरखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे संत्री व मोसंबीवर बुरशी रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. यामुळे मोठ्या प्रमाणात संत्रा व मोसंबीचे नुकसान झाले होते. नुकसान होवून पंचनामे करण्याचे आदेश हे तत्कालीन महायुतीच्या सरकारने दिले नव्हते. नुकसानीचे पंचनामे होण्यासाठी त्यांनी निवेदने सुध्दा दिली होती. तरीपण यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती. यामुळे सलील देशमुख यांच्या नेतृत्वात दि. २० ऑगस्ट २०२४ ला नागपूर येथील संविधान चौकात तीव्र आंदोलन करून हेक्टरी ५० हजार रूपयांची मागणी केली होती. यावेळी सलील देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना अटक सुध्दा करण्यात आली होती. या आंदोलनानंतर प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. यासाठी सुरुवातीला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तज्ञांनी सर्व्हे करुन अतिवृष्टीमुळे बुरशी रोग आला व त्यामुळे संत्री व मोसंबीची फळगळ झाल्याचा अहवाल दिला होता अशी माहिती सलील देशमुख यांनी दिली.
कृषी विद्यापीठाच्या तज्ञांचा अहवाल आल्यानंतर तलाठी, कृषी विभाग व ग्रामसेवक यांच्या चमुंनी काटोल व नरखेड तालुक्यातील नुकसानीचा सर्व्हे करुन तो अहवाल उपविभागीय अधिकारी, काटोल यांना सादर केला होता. यानंतर जिल्हाधिकारी व विभागायीय आयुक्त यांच्या मार्फेत तो नुकसानीचा अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्यात आला होता. अहवाल सादर करुनही तत्कालीन महायुतीच्या सरकारकडे सलील देशमुख यांनी नुकसान भरपाई मिळण्यासाठी आपला सातत्यपुर्ण पाठपुरावा सुरुच ठेवला होता. यासाठी त्यांनी तत्कालीन वित्त मंत्री अजित पवार यांची सुध्दा भेट घेतली होती. मध्यतरी विधानसभेच्या निवडणुका आल्या आणि हा प्रस्ताव तसाच पडला होता. राज्यात परत महायुतीचे सरकारले आले असले तरी सलील देशमुख यांनी पाठपुरावा सुरुच ठेवला. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आणि प्रति हेक्टरी ३६ हजार रुपयाची मदत जाहीर करण्यात आली. संत्रा व मोसंबी उत्पादकांना मदत देण्यासाठी काटोल तालुक्यासाठी १९ कोटी रुपये तर नरखेड तालुक्यासाठी २८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्याची प्रक्रिया सुरु झाल्याची माहिती सुध्दा सलील देशमुख यांनी दिली आहे.
हे ही वाचा:
रशियाने दक्षिण युक्रेनवर केला मोठा मिसाइल हल्ला, शहरात न्यूक्लियर प्लांट
Bigg Boss 18 : धनश्रीसोबत घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान, युझवेंद्र चहल बिग बॉसमध्ये प्रवेश करणार!