Thursday, April 25, 2024

Latest Posts

शिरपूरच्या तृप्तीची आधुनिक हिरकणी सारखीच गोष्ट

इतिहासात आपण अनेक वेळा हिरकणीची गोष्ट ऐकली असेल. बाळाला भेटण्यासाठी आई गडावरच्या कड्यावरून भयाण रात्री उतरते. ती फक्त बाळाला भेटण्याच्या असणे पोटी. अगदी त्याच प्रमाणे आपल्या बाळाला भेटण्यासाठी काय करु शकते हे दाखवून देणारी घटना नाशिकमध्ये घडली आहे.

इतिहासात आपण अनेक वेळा हिरकणीची गोष्ट ऐकली असेल. बाळाला भेटण्यासाठी आई गडावरच्या कड्यावरून भयाण रात्री उतरते. ती फक्त बाळाला भेटण्याच्या असणे पोटी. अगदी त्याच प्रमाणे आपल्या बाळाला भेटण्यासाठी काय करु शकते हे दाखवून देणारी घटना नाशिकमध्ये घडली आहे. नाशिक शहरातील पेठ रोड भागातील तृप्ती स्वप्नील जगदाळे-सोनार यांनी बाळाच्या काळजीपोटी चौथ्या मजल्यावरुन ग्रीलचा आणि पाइपचा आधार घेत तिसऱ्या मजल्याच्या पायऱ्यांवर उतरण्याचं धाडस केलं.

२८ वर्षीय तृप्ती या मूळच्या शिरपूरच्या असून सध्या त्या सुंदरम पॅलेस फ्लॅट नंबर १९, चौथा मजला, शरदचंद्र पवार मार्केट पाठीमागे अष्टविनायक नगर, पेठ रोड नाशिक येथे वास्तव्यास असतात. २२ मे रोजी तृप्तीताई आणि त्यांचं दीड महिन्यांचं बाळ हे दोघेच घरी होते. तृप्तीताईंचे पती स्वप्नील घरातील नातेवाईकाचा साखरपुडा असल्यानं तीन वर्षांची मुलगी मृण्मयीला घेऊन शिरपूरला गेले होते. घरात दोनजण असल्यानं मुख्य दरवाजा बंद करुन त्या घरात काम करत होत्या. तृप्ती जगदाळे सोनार यांनी त्यांच्या बाळाला २२ मे रोजी झोळीत झोपवलं होतं. त्या घरातील कामं करत होत्या. घरात स्वच्छता केल्यानंतर त्या कचरा गॅलरीतील टाकण्यासाठी गेल्या आणि नेमक्या त्याचवेळी हवेच्या दाबामुळं गॅलरीचा दरवाजा बंद झाला आणि तृप्ती ताई गॅलरीत अडकून पडल्या. गॅलरीत अडकल्यानं बाळापर्यंत कसं पोहोचायचं असा प्रश्न त्यांच्या समोर होता. तृप्ती जगदाळे सोनार यांच्या पुढं घरात कसं पोहोचायचं असा प्रश्न होता. कारण, दीड महिन्याचं बाळ घरात झोळीत झोपवलेलं होतं. त्याच्यापर्यंत काहीही करुन पोहोचायचं, असा त्यांचा प्रयत्न होता. त्यावेळी त्या आईची स्थिती अक्षर तळमळीची होती. आणि त्यामुळेच तृप्ती ताईने बाळाकडे पोहोचण्यासाठी जे काही करावे लागेल ते करायचे असा दृढ निश्चय मनात बाळगला होता.

पती आणि मुलगी गावाकडे साखरपुडा करण्यासाठी गेलेले असल्यानं ते लवकर परत येणे अशक्य होतं. हे त्या समजून गेल्या होता. आणि झोळीमध्ये झोपवलेली बाळ उठे पर्यंत त्यांना काहीही करून बाळाच्या जवळ पोहोचायचेच होते. नाही तर बाळ रडून कासावीस होईल अशी त्यांना भिति वाटत होती. त्यामुळं तृप्ती यांनी गॅलरीला असलेल्या भिंतीचा आधार घेत ग्रीलच्या सहाय्यानं घेत बाळापर्यंत पोहोचण्यासाठी जे करायला लागेल ते करायचं असं ठरवलं. ग्रीलच्या बाजूनं असलेल्या पाइपचा आधार घेत तिसऱ्या मजल्याच्या त्या पायऱ्यांवर उतरल्या. तिथून पायऱ्यांवरुन चौथ्या मजल्यावर जात घराच्या मागच्या दारानं त्या खोलीत पोहोचल्या आणि बाळाला पोटाशी लावलं. खरंच एक आईने बाळासाठी जी स्टंटबाजी केली. ती अतुल्याणीय होती. बाळासाठी तृप्ती ताईने आपल्या जीवाचा देखील विचार केलं माही. आणि बाळाच्या ओढीमुळे त्या बाळापर्यंत पोहोचल्या. त्यानंतर घराचा मुख्य दरवाजा उघडला.

हे ही वाचा:

महापुरुषांवर गरळ ओकनाऱ्यांवर वेळीच कारवाई झाली पाहिजे, अजित पवार

राज ठाकरे आणि अवधूत यांच्यामधील प्रश्नावलीपर चर्चा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss