Thursday, March 28, 2024

Latest Posts

संथगतीने चालू असणाऱ्या समृद्धी महामार्ग प्रकल्प जाणार ३ महिने पुढे

मुंबई ते नागपूर हा समृद्धी महामार्ग ७०१ किमी अंतराचा आहे. त्यापैकी नागपूर ते शिर्डी असा ५०१ किमीचा टप्पा सुरू झाला आहे. तर, उरलेल्या टप्प्याचे काम न कालुवार आणि संथ गतीने होताना पाहायला मिळत आहे.

मुंबई ते नागपूर हा समृद्धी महामार्ग ७०१ किमी अंतराचा आहे. त्यापैकी नागपूर ते शिर्डी असा ५०१ किमीचा टप्पा सुरू झाला आहे. तर, उरलेल्या टप्प्याचे काम न कालुवार आणि संथ गतीने होताना पाहायला मिळत आहे. त्यापैकी शिर्डी ते भरवीर पर्यंतचे ८०किमी महामार्गाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. शिर्डी ते भरवीर पर्यंतचा ८० किलोमीटरचा समृद्धी महामार्गाचा हा दुसरा टप्पा आहे. त्यामुळे भरवीर ते नागपूर अंतर सहा तासात पार करणे शक्य होणार आहे. राज्यातील महत्त्वाच्या महामार्गापैकी एक असणाऱ्या मुंबई ते नागपूर ही शहरे जोडणाऱ्या समृद्धी महामार्ग बनवण्याच काम अंतिम टप्य्यात आले आहे. मात्र प्रकल्प पूर्ण करण्याची डेडलाईन तीन महिने पुढे ढकलली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आहे. समृद्धी महामार्ग प्रकल्प पूर्ण होण्याची डेडलाईन डिसेंबर २०२३ वरून मार्च२०२४ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सह्याद्री पर्वत रंगातील टप्पा १५ आणि टप्पा १६ चे काम अजून बरेच बाकी असून या भागात बराच चढ-उतार असल्याने या रस्त्यासाठी अजून वेळ लागण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात ब्लास्टिंगचे काम नियमित होत नसल्याने हे काम डिसेंबर २०२३ पर्यंत होणार नसल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. टप्पा 15 अंतर्गत वशाला ते भिरवाडी हे २८ किलोमीटरचे अंतर आहे आणि टप्पा १६ मध्ये भिरवाडी ते आमने (ठाणे) हे ३७ किलोमीटरचे अंतर आहे. या भागातील जमीन अधिग्रहणमध्ये अडचणी आल्याने शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करून कामाची सुरवात करायला नोव्हेंबर २०१८ ची वाट पाहावी लागली होती. त्यामुळे या भागात समृद्धी महामार्गाचे काम रेंगाळले असून राज्य सरकार लोकसभा निवडणुकीच्या आधी समृद्धी प्रकल्प पूर्ण करण्याच्या आटोकाट प्रयत्नात आहे.

शिर्डी ते भरवीर हा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर नागपूर ते भरवीर असा ६००किलोमीटरचा समृद्धी महामार्गावरील मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. आणि त्यामुळे आपण कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अंतर कापले जाणार आहे. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गातील डिसेंबर २०२२ ला नागपूर ते शिर्डी हा ५२० किमीचा समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यानुसार शिर्डी ते भरवीर अशा ८० किमीच्या महामार्गाचे काम जवळपास झाले आहे.पुढल्या वर्षी म्हणजे २०२४ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लागण्याआधी समृद्धी महामार्गाचं काम पूर्ण करून हा महामार्ग सुरू करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याची चर्चा आहे. आणि त्यामुळे सरकारवर जनतेचा अजून विश्वास बसेल. एप्रिल २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत. तर ऑक्टोबर २०२१ मध्ये विधानसभा निवडणुका होतील. त्याच्या आधी जनतेसाठी हा संपूर्ण महामार्ग खुला करण्याचा सरकारचा मानस असल्याची चर्चा आहे.

हे ही वाचा:

११ महिन्यांपूर्वी स्थापन केलेल्या सरकारने दिले शेतकऱ्यांना आव्हाहन

जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात कोणताही वाद नाही, छगन भुजबळ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss