या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अख्खा सांगली जिल्हा पाणी टंचाईने होरपळू लागला आहे. कृष्णा नदी सांगलीत कोरडीठाक पडल्याने चिंतेत आणखी भर पडली आहे. कोयना धरणातून कृष्णा नदीत आज दुपारी बारा वाजल्यापासून एक टीएमसी विसर्ग केला जाणार आहे. शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांनी कृष्णा नदीतील कोरड्या पडलेल्या परिस्थितीची फोनद्वारे सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना माहिती दिली. यानंतर पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ऐन सणासुदीच्या तोंडावर कुपवाडवर पाणी टंचाईचे सावट गडद
सांगली, कुपवाड शहराला दररोज दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा नदीतील पाण्याची पातळीत कमालीची घट झाली आहे. नदीपात्रात पाच दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावरच सांगली, कुपवाडवर पाणी टंचाईचे सावट गडद झाले आहे. महापालिकेने कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली आहे.
जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका
सांगली जिल्ह्यातील जत तालुका दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी उद्या जिल्हाधिकारी कार्यालय समोर सर्वपक्षीय नेते एकत्र येत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत. आमदार विक्रमसिंह सावंत, माजी आमदार विलासराव जगताप यासह जत तालुक्यातील सर्व पक्ष नेते या उपोषणास बसणार आहेत.
जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका असून, दुष्काळ हा जत तालुक्याच्या पाचवीला पुजला आहे. जत तालुका १०० टक्के अवर्षणग्रस्त तालुका आहे. तालुक्यातील सर्व तलावांमधील सद्यस्थित शिल्लक पाणीसाठा ३ टक्के असून एकूण २७ तलावांपैकी १० तलावांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा म्हणजे कोरडे असून उर्वरित तलावामध्ये मृतसंचय पाणीसाठा आहे.
हे ही वाचा :
‘बिग बॉस’च्या घरात अंकिता लोखंडे आणि विकी जैनमध्ये वाद
संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, मुख्यमंत्री भाजपची भांडी घासतात…