शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ९ मार्च रोजी ईशान्य मुंबई मधील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातून होणारे आउटगोइंग रोखण्यासाठी महाराष्ट्रात असे विभाग वार मेळावे घेतले जाणार आहेत. संजय राऊत यांनी आज २७ फेब्रुवारीला मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात जाऊन पाहणी केली.
संजय राऊत म्हणाले, “आम्ही जेव्हा पक्षाचं काम सुरू केलं, आमच्या काळात तेव्हा शिवसेनेची विभाग शिबिर आम्ही नेहमी घेतो. आम्ही शाखांचे वर्धापन दिन आमच्या काळात साजरे होत होते आणि त्या वर्धापन दिनाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे देखील शाखेत येत असत. आम्हाला त्या पद्धतीने नव्याने काम करणे गरजेचे आहे, असे लक्षात आले. पराभव होत असतात, लोकसभेला जिंकलो, विधानसभेला आम्ही जिंकू शकलो नाही. पण शिवसेनेचा उत्साह आणि जिद्द कायम आहे. ज्या प्रकारचं राजकारण आणि दबावाचे राजकारण सुरू आहे, प्रशासनमध्ये जे भाई निर्माण झाले आहे, ईव्हीएममुळे हरलो, पैशामुळे हरलो असेल पण त्यांना आम्हाला एक प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.”
पुढे ते म्हणाले, “देशाच्या राजधानीत मराठी साहित्य संमेलन भरवले जाते. त्या संमेलनात मुख्यमंत्री, मोदीजी येतात आम्ही मराठीचा जयजयकार करतात. जे ठाणे शहर मराठीची पंढरी होती आणि साहित्यिक मोठे झाले, त्या ठाण्याच्या महानगरपालिकेमध्ये त्या ठाण्यात पदवीधरांना वेतन वाढ नाकारली जात असेल तर या राज्याचे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार वाहक आम्हीच आहोत असे दाढीवाले जे सांगत आहेत त्या दाढीवाल्यांना प्रश्न विचारला पाहिजे. हा मराठी वरचा बलात्कार आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.