शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज २५ डिसेंबर ला घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर टीका केली आहे. ते म्हणाले,” भाजपचं नेतृत्त्व पंडित नेहरूंवर रोज चिखलफेक करत असले तरी अटल बिहारी वाजपेयी हे दुसरे नेहरू होते. अटलजी हे नेहरू यांचे भक्त होते. स्वतः नेहरू यांनी अटल जी यांना आशीर्वाद दिले. राज धर्माच पालन कसे करायचं हे अटलजी यांच्याकडून शिकावं, जो पर्यंत अटलजी यांच्याकडे भाजप होत तेव्हा एक सर्वसमावेशक होता,पण आता बघा, वाजपेयी गेले आणि त्यांची भूमिकाही संपली. बाळासाहेब यांच्यासाठी अटलजी आणि अटलजी यांचा शब्द महत्वाचा असायचा,” असे संजय राऊत म्हणाले.
लाडक्या बहिण योजना तसेच २ लाख कोटींची तूट भरून काढण्यासाठी महसूल वाढीसाठी दारूच्या दुकानांचे परवाने वाढवणे गरजेचं आहे, असे अजित पवार म्हणाले. त्यावर पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, “लाडक्या बहिणीनं १५०० रुपये देण्यासाठी लाडक्या बहीणीचे भाऊ आणि नवरे दारुडे करणार आहेत. प्या दारू. १५०० रुपयांसाठी संपूर्ण महाराष्ट्र ते दारुडा करणार असतील तर ते अत्यंत गंभीर आहे”.दारूची दुकाने वाढवणार आहेत. ड्राय डे कमी करणार आहेत. काही राज्यात घरपोच दारू पोहचवण्याची स्कीम आहे. तीही इथे आणण्याचं चाललं आहे. लाडक्या बहिणीना पैसे देण्यासाठी घराघरात दारू पोहचविण्याची योजना आहे. ही महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लावला जात आहे.अजित पवार असे करत असेल तर त्यांनी यशवंतराव चव्हाण यांचे फोटो लावतात त्यांनी बघा,” अशा शब्दात संजय राऊत यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.
“निवडणुकींच्या आधी मतांसाठी तुम्ही कोणते निकष लावले नाही आणि आता निवडणूका झाल्यावर निकष लावले जात आहेत. बहिणीनी चिंतन केले पाहिजे की १५०० रुपयांसाठी कोणते विष आपण आणत आहोत, हे बहिणींनी पाहिलं पाहिजे. ४० रुपये लसूण ४०० रुपयांवर गेला आहे. १५०० रुपयांमध्ये काही येत नाही,” असा खोचक शब्दात संजय राऊतांनी टीका केली.
हे ही वाचा:
Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?
लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule