Sanjay Raut PC: आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा स्मृतीदिन आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी करण्यात येत आहे. ठाकरे गटाकडून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदूह्रद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. तसेच बेळगावच्या मुद्द्यांवर देखील भाष्य केले आहे. महाराष्ट्र सरकारकडून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या “अनादी मी अनंत मी.. ” या गीताला छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने ‘महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार’ गौरवण्यात आलं आहे. याचाच धागा पकडत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्मृती दिन आहे. महाराष्ट्राने दोन हिंदुत्ववादी नेत्यांना भारतरत्न द्यायला हवा. असा ठराव महाराष्ट्राने केंद्राला पाठवायला हवा. मोदी फ्रान्समध्ये गेले, ज्या ठिकाणी सावकरांनी बंदी असताना ब्रिटिशांच्या बोटीतून उडी मारत ज्या बंदरावर आले होते त्या ठिकाणी जात सावरकरांना मोदींनी नमन केले. पण हा त्यांचा पब्लिसिटी स्टंट आहे, तुमच्या हातात सत्ता आहे. मतदानाचं गणित जुळवण्यासाठी राज्यस्तरीय नेत्यांना भारतरत्न दिला. आमची एकच मागणी आहे की, वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे या दोन हिंदूहृदयसम्राट आहेत या दोघांनाही भारतरत्न द्या. देवेंद्र फडणवीसांना मला सांगायचं आहे की, महाराष्ट्र सरकराने एक ठराव केंद्र सरकारला पाठवायला पाहिजे. दोन हिंदूहृदयसम्राट वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरेंनी हिंदूत्त्वाला नवी दिशा दिली. बाकी सगळे त्यांच्या जीवावर चाललं असून आताचे नकली त्याच हिंदूत्त्ववावर जगत आहेत. केंद्र सरकारला दोन्ही नेत्यांना भारतरत्न देण्याचा एक ठराव पाठवावा, असंही संजय राऊत म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वी सभेत जनतेचा पैसा खाऊ देणार नाही, खात असतील तर नावं द्या असे म्हणाले होते. त्यानुसार आम्ही आता त्यांना २६ नावे देणार आहोत. आजच फ्रान्स कंपनीने कसा पैसा मागितला जातो याचा खुलासा केला आहे. नगरविकास विभागाने अहवाल मागितला आहे. देवेंद्र फडणवीसांना कोणत्या अडथळ्यातून सरकार चालवावं लागत आहे ते दिसतयं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी स्वागत केले आहे. भ्रष्टाचारात मंत्र्यांचे पीए ओसडी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुख्यमंत्र्यानी त्यावर रोख लावली. मात्र ज्या मंत्र्यांनी त्यांना ठेवण्याचा प्रयत्न केला त्यांचीही नावे जाहीर करा, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
देवेंद्र फडणवीसांचं मी स्वागत केलं आहे. कारण मंत्रालयात भ्रष्टाचार करण्यात काही मंत्र्यांच्या पीए आणि ओसडींचा समावेश असल्याच फडणवीसांचं निरीक्षण आहे. अशांना रोखण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी काही काही पीए आणि ओसडींची नियु्क्ती केली नाही. फडणवीसांचा शब्द आहे हे लोकं फिक्सर आहेत, जर मुख्यमंत्री भ्रष्टाचार रोखण्यासाठी काही पाऊले उचलत असतील तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे. पण हे मंत्री कोण आहेत हे लोकांना समजायला हवं, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा:
Bird Flu in Maharashtra: धाराशिव येथे कावळ्यांना बर्ड फ्लू; अनेक कावळ्यांचा मृत्यू