spot_img
Wednesday, March 19, 2025

Latest Posts

Sanjay Raut : खरी शिवसेना कोणती हे अमित शहा सत्तेत नसतील तेव्हा समजेल – Sanjay Raut

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर आव्हान (Sanjay Raut Challenged Eknath Shinde) दिलं आहे. एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) नवीन पक्ष स्थापन करत फक्त पाच आमदार निवडून आणून दाखवण्याचं आव्हान संजय राऊतांनी (Sanjay Raut) दिलं आहे. एकनाथ शिंदे हे घाबरलेले, लाचार व्यक्ती आहेत. त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करून पाच आमदार तरी निवडून आणणून दाखवावे, असे आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना दिले आहे.

Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर आव्हान (Sanjay Raut Challenged Eknath Shinde) दिलं आहे. एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) नवीन पक्ष स्थापन करत फक्त पाच आमदार निवडून आणून दाखवण्याचं आव्हान संजय राऊतांनी (Sanjay Raut) दिलं आहे. एकनाथ शिंदे हे घाबरलेले, लाचार व्यक्ती आहेत. त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करून पाच आमदार तरी निवडून आणणून दाखवावे, असे आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना दिले आहे. इतकंच नाहीतर पक्ष नाही स्थापन केला तर चिन्ह परत करावं आणि निवडणूक लढवावी, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदेनी अमित शहांना लोहपुरुषाची उपमा दिली. त्यावरून संजय राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “एकनाथ शिंदे हे घाबरलेले व्यक्ती आहेत. लोहपुरुष जर अमित शहा आहेत तर सरदार वल्लभभाई पटेल, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कोण आहेत? एकनाथ शिंदे घाबरलेले, लाचार आहेत. खरी शिवसेना कोण व खोटी कोण हे अमित शहा सत्तेत नसतील तेव्हा सर्वांना कळेल. आज दहशत, दबाव, पैशांची ताकद, निवडणूक आयोग ताब्यात घेऊन तुम्ही सर्व करत आहात. एकनाथ शिंदेनी स्वतःचा पक्ष स्थापन करून पाच आमादार निवडून आणून दाखवावे. जे चिन्ह चोरलंय ते परत करावं व नवीन चिन्ह घेऊन लढवून दाखवावं. बाळासाहेबांच्या घरात घुसून तुम्ही चोऱ्या करता आणि आम्हाला अमित शहांची दादागिरी दाखवता. अमित शहा काही अमृत पिऊन आलेले नाहीत. कधी ना कधी जायचंच आहे प्रत्येकाला. तेव्हा जनता फैसला करेल, असा जोरदार घणाघात संजय राऊत यांनी केला

दरम्यान, राऊतांनी विखे पाटलांवरही जहरी शब्दात टीका केली आहे. दहावेळा साड्या बदलणाऱ्या लोकांनी आम्हाला शिकवू नये, असं म्हणत राऊतांनी विखेंवर निशाणा साधला. जे दहावेळा पक्ष सोडून गेलेत, त्यांना पहिलं मंत्रीपद उद्धव ठाकरेंनी दिलं आहे त्यांच्या वडिलांनासुद्धा हे त्यांनी विसरू नये. दहावेळा साड्या बदलणारे लोकं आहेत हे, त्यांनी आम्हाला शिकवू नये. आपण मातोश्रीवर येत होतात आणि जात होतात. तुम्हालाही धक्के बसतील, धक्का बसू नये म्हणून तुम्ही पक्ष बदलता. हिंमत असती तर पक्ष बदलले नसते. ज्या काँग्रेसने तुम्हाला सर्व काही दिलं, ज्या शिवसेनेनेही तुम्हाला सर्व काही दिलं त्यांच्याबद्दल असं बोलता म्हणत संजय राऊतांनी विखे पाटलांवर निशाणा साधला.

Pune Crime : मकोका कायद्याअंतर्गत आरोपी असलेले ‘छावा’ पाहायला गेले न फसले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss