शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तुफान टीका केली. आम्ही भाजपचे मांडलिक मुख्यमंत्री आहोत .आम्ही गुलाम आहोत. हे त्यांनी स्पष्ट करावं आम्ही त्यांच्यावरती आम्ही टीका करणार नाही, असं संजय राऊत म्हणाले. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Shirdi visit) यांच्या शिर्डी दौऱ्यावर शिवसेना खासदार संजय राऊतयांनी हल्लाबोल केला. “निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत का महाराष्ट्रात ते पाहावे लागेल. सरकार बदलत आहे. राष्ट्रपती शासन लागत आहे. काही होऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार साईबाबा दर्शन घेणार भाषण करणार स्वतः ते एक बाबा आहेत”, असं संजय राऊत म्हणाले आहेत .
ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोल वारंवार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दिल्लीला जात आहेत. या सरकारचं दिल्लीत पायपुसणे केलेलं आहे.छत्रपती शिवाजी महाराज एकदाच दिल्ली आणि आग्राला गेले आणि सर्व खानांना धडा शिकून आले. मात्र महाराष्ट्र सरकारचे मंत्री दिल्लीश्वरांना चहा पिऊ का पाणी पिऊ का हे विचारण्यासाठी वारंवार दिल्लीत जातात, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
गुलाम आहे हे स्पष्ट करा, आम्ही टीका थांबवतो
मंत्रिमंडळाचा विस्तार राहिला बाजूला विकास राहिला बाजूला. आम्ही भाजपचे मांडलिक मुख्यमंत्री आहोत .आम्ही गुलाम आहोत, हे त्यांनी स्पष्ट करावं आम्ही त्यांच्यावरती आम्ही टीका करणार नाही. आज आम्हाला टीका करण्याचा अधिकार आहे.आज महाराष्ट्राची प्रतिष्ठा दिल्ली चरणी आहे, असा घणाघात संजय राऊतांनी केला.
भाजपकडे बिनकामाचे १०५ चा आकडा
भाजपकडे १०५ चा आकडा असून काय वेळ आली आहे. हाजी हाजी करावं लागत आहे .बेकायदेशीर आणि दुसऱ्याला मंत्रिमंडळात आणावे लागत आहे. ही शोकांतिका आहे. राम मंदिर बनत आहे. पंतप्रधान मोदी तिथे जाणार. एवढा मोठा इव्हेंट ते कसे सोडणार? इंडिया आलायन्सला भाजप घाबरलेली आहे, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.
मोदींच्या कार्यक्रमात लोकांनी गाड्या परत पाठवल्या
कोणीही त्या कार्यक्रमाला सरकारी गाडीतून जाणार नाही .त्या गाड्यांमध्ये बसायला कोणी तयार नाही. गर्दी करायला सुरू आहे. लोकांनी त्या गाड्या परत पाठवल्या आहेत. पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला लोकांनी यावं. यापूर्वी एकेकाळी नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमास लोक उत्स्फूर्तपणे जात होते ,मात्र आज पंतप्रधान म्हणून नाही तर भाजपचे नेते म्हणून लोक त्यांच्या कार्यक्रम बहिष्कार टाकत आहे. हे भाजपने स्वीकारायला हवं, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
हे ही वाचा :
धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, पाडवा, भाऊबीजेची योग्य तारीख, शुभ मुहूर्त जाणून घ्या
‘लंडन मिसळ’ चित्रपटात भरत जाधव झळकणार हटके भूमिकेत
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .